Aadhaar लिंक करण्याबाबत आलीये खुशखबर, सरकारने घेतलाय हा निर्णय
आधारला छोट्या बचत योजनांना लिंक करण्याबाबत चांगली बातमी समोर आलीये. केंद्र सरकारने पोस्ट ऑफिस आणि किसान विकास पत्र सारख्या लहान योजनांना आधारशी लिंक करण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवलीये.
नवी दिल्ली : आधारला छोट्या बचत योजनांना लिंक करण्याबाबत चांगली बातमी समोर आलीये. केंद्र सरकारने पोस्ट ऑफिस आणि किसान विकास पत्र सारख्या लहान योजनांना आधारशी लिंक करण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवलीये.
ग्राहकांना आता या बचत योजनांना आधार लिंक करण्यासाठी ३१ मार्च २०१८पर्यंत मुदत वाढवून देण्यात आलीये. अर्थ मंत्रालयाने सोमवारी संध्याकाळी याबाबतचे निवेदन जारी केले.
यावर सरकारचा आहे भर
सरकार आतापर्यंत बँक खाते, मोबाईल नंबर तसेच अन्य काही सेवांना आधार लिंक करण्यासाठी आग्रही होती. सरकारच्या मते या बाबी आधारशी लिंक केल्याने काळ्या पैशावर नियंत्रण मिळवता येईल.
३१ डिसेंबर होती शेवटची तारीख
ऑक्टोबर २०१७मध्ये सरकारने छोट्या बचत योजना जशा पोस्ट ऑफिस, डिपॉझिट, पीपीएफ, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम आणि किसान विकास पत्र सारख्या योजनांना आधार लिंक करण्याचे आदेश दिले होते. यासाठी सरकारने ३१ डिसेंबर ही शेवटची तारीख ठरवली होती.
या योजनांचीही मुदत वाढवली
सरकारने याशिवाय अनेक सरकारी योजनाही आधारशी लिंक करण्याची मुदत वाढवलीये. या योजनांमध्ये फ्री ग्रॅस, मनरेगा आणि पब्लिक डिस्ट्रीब्यूशन सिस्टम यासारख्या स्कीम आहेत.