नवी दिल्ली: देशाची राष्ट्रीय विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाची लवकरच विक्री होऊ शकते. आगामी आर्थिक वर्षात एअर इंडियातील निर्गुंतवणूक प्रक्रियेला प्रत्यक्षात सुरुवात होऊ शकते. यामधून केंद्र सरकारला ७००० हजार कोटींचा घसघशीत निधी मिळेल, असा अंदाज आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, २०१८-१९ च्या नंतरच्या सहामाहीत एअर इंडियाची प्रत्यक्ष विक्री होऊ शकते. तत्पूर्वी एअर इंडियाच्या उपकंपन्या आणि इतर मालमत्तांची विक्री केली जाईल. सध्याच्या घडीला एअर इंडियाच्या डोक्यावर ५५ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात सरकारने विशेष कंपनी (स्पेशल पर्पज व्हेईकल) स्थापन करून २९ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा भार कमी केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एअर इंडियाची इमारत विक्रीला, पण सरकारचं घेणार विकत


यापूर्वी केंद्र सरकारने एअर इंडियातील समभागांचा काही वाटा विकण्याची योजना आखली होती. यामध्ये सरकारने ७६ टक्क्यांपर्यंतची मालकी विकण्याची तयारी दाखविली होती. मात्र, त्यासोबत गुंतवणूकदारांना २४ हजार कोटी रुपयांचे कर्ज व ८ हजार कोटींची देणी असा दुहेरी भार उचलावा लागणार होता. परिणामी गुंतवणूकदारांनी त्याला फारसा प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे काही टक्के समभाग विकून निधी उभारण्याचा सरकारचा प्रयत्न फसला होता. यानंतर गेल्याच महिन्यात सरकारने एअर इंडियामध्ये २,३४५ कोटी रुपयांचे नवे भांडवल टाकण्यासाठी संसदेची मंजुरी मिळवली होती. 


एअर इंडिया विदेशी कंपनीला विकू नका