लखनऊ : लग्न करण्याच्या काही वर्षे आधीपासूनच पैसे गोळा करायला सुरूवात करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नात लागणाऱ्या कपडे-भांडी यासारख्या वस्तू, वऱ्हाडी यांसाठी हजारो रुपये खर्च होतात.


पण आता हा खर्च तुम्हाला सरकार देणार आहे. एवढच नव्हे ते वधूला ३ हजार रुपयांपर्यतचा मोबाईलदेखील मिळणार आहे. याबद्दल सविस्त जाणून घेऊया.


बॅंक खात्यात २० हजार 


या योजनेनुसार मुलीला २० हजार रुपये मिळणार आहेत. कॅश देण्याऐवजी ही रक्कम थेट लाभार्थीच्या खात्यात ठेवली जाणार आहे. 


१० हजारांच्या वस्तू 


याशिवाय १० हजार रुपयांमध्ये कन्येसाठी कपडे, चांदीचे पैजण,जोडवी आणि सात भांडी दिली जाणार आहेत. 


५ हजार जेवणासाठी


प्रत्येक जोडप्यामागे ५ हजार रुपये घरच्या आणि वऱ्हाडाच्या जेवणाच्या खर्चासाठी देण्यात येणार आहेत. सामुहिक विवाह कार्यक्रमात किमान १० जोडपी असणे गरजेचे आहेत. 


गरजूंना लाभ 


गरजूंपर्यंत सामूहिक लग्न अनुदान योजनेचा लाभ पोहोचविण्याची तयारी सुरू असल्याचे वाराणसीच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर.के. यादव यांनी सांगितले. 


योजनेसाठी खर्च 


सरकारने या योजनेसाठी १ कोटी ६६ लाख ६० हजार रुपये दिले आहेत. 


लग्नाची तारीख मिळणार 


अर्ज केल्यानंतर सामुहिक लग्न कधी होणार आहेत याची तारीख दिली जाणार आहे.


१०० जोडप्यांचे लग्न 


२० ते ३० जानेवारी दरम्यान १०० जोडप्यांचे सामुहिक लग्न लावण्याचे लक्ष ठेवले आहे.


बनारसमधून सुरुवात 


उत्तर प्रदेश सरकारच्या सामूहिक विवाह योजनेअंतर्गत लग्न करणाऱ्या तरुणींना ३,००० रुपयांचा मोबाइल देण्यात येणार आहे.


एवढच नव्हे तर या योजनेअंतर्गत ३५ हजार रुपयेही देण्यात येणार आहेत. सध्या पंतप्रधानांचे संसदीय क्षेत्र असलेल्या बनारसमधून केली जाणार आहे.