मुंबई : देशभरात २००० रुपयांच्या नोटा बंद केल्याच्या अफवांना सरकारने पूर्णविराम दिला आहे. यासंदर्भात अर्थ मंत्रालयाकडून कोणतीही सूचना नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने स्वतःच एटीएममध्ये लहान आकाराच्या नोटा ठेवण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरुन ग्राहकांना सुविधा मिळावी. काही बँकांनी त्यांची एटीएम मशीन छोट्या नोटांमध्ये रूपांतरित करण्यास सुरुवात केली आहे. इतर काही बँका देखील या प्रकारचे पाऊल उचलू शकतात. त्यामुळे २००० रुपयांची नोट अनेक एटीएम मशिनमध्ये ठेवण्यात येत नाहीत. तसेच अनेकांना सुट्टे पैसे मिळण्यास अडचण होत आहे. त्यामुळे मोठ्या व्यवहारांसाठी २००० रुपयांच्या नोटांचा विचार करण्यात येत आहे. त्यामुळे दोन हजार रुपयांची नोट काही बंद होणार नाही. केवळ अफवा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२००० नोट बंद होणार नाही, याबाबत सरकारने अनेकदा स्पष्ट देखील केले आहे. तरीही पुन्हा एकदा तोच प्रश्न समोर आला आहे. आता एटीएममधून २००० रुपयांच्या नोटांऐवजी ५०० रुपयांच्या नोटा अधिक येत आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात शंका येण्यास सुरुवात झाली आहे. २००० रुपयांची नोट खरोखर बंद होणार का? सरकारने याआधीही स्पष्ट केले होते, आता यापुढे एटीएममधून २००० रुपयांच्या नोटा कमी येतील, परंतु कोणत्याही बँकेच्या शाखेतून तुम्हाला त्या सहज मिळतील.


सरकार २००० ऐवजी ५००, २०० आणि १०० रुपयांच्या नोटा या एटीएममध्ये फीड करत आहे. कारण २००० रुपये सुट्टे मिळण्यास बऱ्याचदा लोकांना त्रास होतो. त्यामुळे आता बँकांच्या एटीएममधून दोन हजार ऐवजी ५०० च्या नोटा येत आहेत. इंडियन बँकेने ग्राहकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेतला आहे, परंतु २००० रुपयांची नोट बंद होणार आहे, असा अर्थ घेतला जाऊ नये. यापूर्वीही आणि सरकारशी या संदर्भात खोटी बातमी पसरली गेली आहे, ही नोटी बंद करण्याचा विचार नाही, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.


इंडियन बँक ऑफ चेन्नईने ग्राहकांच्या सोयीसाठी २००० रुपयांच्या नोटा एटीएममध्ये न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त इंडियन बँकेने हा निर्णय घेतला आहे. सरकार किंवा आरबीआयकडून कोणत्याही प्रकारची सूचना नाही. अन्य कोणत्याही सरकारी किंवा खासगी बँकेने असा निर्णय घेतला नाही.


नोव्हेंबर २०१६ मध्ये केंद्र सरकारने आणलेल्या नोटबंदीनंतर दोन हजार रुपयांची नवीन नोट सरकारने जारी केली. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकल्या. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने नवीन ५०० च्या नोटसह २०० रुपयांची नोटही जारी केली.