Edible Oil: गणेशोत्सवानंतर लगेचच नवरात्री आणि दिवाळी हे दोन सण येत आहे. हिंदु धर्मियांसाठी दोन्ही सण खूप महत्त्वाचे आहेत. या दोन्ही सणांना मोठ्या प्रमाणात स्वयंपाकाचा घाट घातला जातो. नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवीचा नैवेद्य केला जातो. तर, दिवाळीत फराळ केला जातो. त्यामुळं ऐन सणासुदीतच गृहिणींचे बजेट बिघडणार आहे. सणासुदीतच खाद्य तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. सरकारने विविध प्रकारच्या खाद्य तेलावर असलेल्या कस्टम ड्युटीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम किंमतींवर होण्याची शक्यता आहे. 


या तेलांवरील कस्टम ड्युटी वाढणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीटीआय या वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सरकारने क्रुड आणि रिफाइंड सनफ्लॉवर ऑइलसह अन्य खाद्य तेलांवरील कस्टम ड्युटी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्टनुसार, अर्थ मंत्रालयाकडून एक अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यानुसार, क्रुड आणि रिफाइंड पाम तेल, सोयाबीन तेल आणि सनफ्लॉवर सीड तेल यांवर बेसिक कस्टम ड्युटी वाढवण्यात आली आहे. 


किती वाढली कस्टम ड्युटी?


क्रुड पाम ऑइल, क्रूड सोयाबीन तेल आणि क्रुड सनफ्लॉवर सीड ऑइलवर बेसिक कस्टम ड्युटीचे दर आत्तापर्यंत शून्य होती. म्हणजेच या तेलांवरील आयात शुल्क लागत नव्हते. आता हेच आयात शुल्क वाढून 20 टक्के इतके करण्यात आले आहेत. तर, रिफाइंड सनफ्लॉवर सीड ऑइल, रिफाइंड पाम ऑइल, रिफाइंड सोयाबीन तेलवर बेसिक ड्युटीचे दर वाढवून 32.5 टक्के करण्यात आले आहे. यापूर्वी हे दर टक्के इतके होते. हे बदल सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. 


कस्टम ड्युटी वाढवल्यावर तेलांच्या किंमती किती वाढतील?


रिपोर्टनुसार, कस्टम ड्युटी वाढवल्यानंतर सर्व खाद्य तेलांवरील प्रभावी शुल्क वाढून 35.75 टक्के इतके होणार आहे. क्रूड पाम ऑइल, क्रूड सोयाबीन तेल आणि क्रूड सनफ्लॉवर सीड ऑइलवरील प्रभावी शुल्क दर आता 5.5 टक्क्यांनी वाढून 27.5 टक्के होणार आहे. तेच रिफाइंड सनफ्लॉवर सीड ऑइल, रिफाइंड पाम ऑइल आणि रिफाइंड सोयाबीन तेलवर प्रभावी शुल्क आता 13.75 टक्क्यांवरुन आता 35.75 टक्के इतकी होणार आहे. 


सणासुदीला वाढतात तेलाच्या किंमती


विविध खाद्य तेलांच्या किंमती अशावेळी वाढवल्या जातात जेव्हा देशात काहीच दिवसांत सणांसुदीचे दिवस असतील. आता सप्टेंबर महिना सरत आला आहे. पुढच्या महिन्यात ऑक्टोबर महिन्यात नवरात्र, दसरा, दिवाळी सण आहेत. अशावेळी सणासुदीच्या दिवसांत खाद्य तेलांच्या किंमतीत वाढ होते.