नवी दिल्ली : टोमॅटो आणि कांद्याचे भाव नुकतेच गगनाला भिडले होते. त्यानंतर भविष्यात विविध कडधान्यांच्या डाळीही याच मार्गावर आहेत. सरकारने उडीद आणि मूगडाळीच्या आयातीवर निर्बंद लावल्यामुळे ही दरवाड होण्याची चिन्हे आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उडीद, मूगडाळीच्या आयातीवर निर्बंद घालताना सरकारने ही डाळ आयात करायचीच असेल तर, त्याची मर्यादाही ठरवून दिली आहे. ही मर्यादा तीन टन इतकी आहे. सरकारच्या या निर्णयामुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर राहण्यास मदत होईल. मात्र, डाळींच्या किमती मात्र सर्वसामान्यांच्या आवाक्यापेक्षा बाहेर जाण्याची शक्यता असेल. शेतकऱ्यांनाही याचा चांगलाच फटका बसेल.


अर्थमंत्रालयाच्या नियंत्रणाखाली असलेल्या विदेश व्यापार महासंचलनालयाने (डीजीएफटी) दिलेल्या माहितीनुसार, या डाळींचा वार्षीक कोटा तीन लाख टन इतका असेन. डीजीएफटीने दिलेल्या एका सूचनापत्रकात म्हटले आहे की, 'उडीद आणि मूग डाळ यांच्या आयातीवर मर्यादा घालण्यात आली आहे.' या डाळी पहिल्यांदा मुक्त श्रेणीमध्ये येत होत्या. या पत्रकात असेही म्हटले आहे की, हे निर्बंध कोणत्याही द्विपक्षीय करार किंवा समझोत्याअंतर्गत येणार नाहीत.
जूनमध्ये संपत असलेल्या कृषी वर्षात २०१६/१७ मध्ये मूगाचे विक्रमी २०.७ लाख टन इतके उत्पादन झाले होते. जे गेल्यावर्षी १५.९ लाख टन होते. भारत हा जगातील डाळ उत्पादक देशांपैकी सर्वात मोठा उत्पादक आणि आयात करणारा देश आहे हे विशेष.