मुंबई : सरकारी इंटर्नशिप (Government Internship) आणि फेलोशिप करण्याचा (Fellowship) विचार करणा-या युवकांसाठी Good news आहे. भारतीय संसदेच्या राज्यसभा सचिवालयाच्या वतीने इंटर्नशिप आणि फेलोशिपसाठी जागा असल्याची सूचना देण्यात आली आहे. या सूचनेनुसार, पदवीधर, पोस्ट ग्रॅज्युएट आणि पीएच.डी. धारकांना इंटरशिपची संधी मिळेल. तुम्ही 31 मार्चपूर्वी इंटर्नशिप आणि फेलोशिपसाठी अर्ज करू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यसभेमध्ये काम करण्यासाठी ईच्छुक असलेल्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. इंटर्नशिपसाठी राज्यसभा रिसर्च अँड स्टडी (RSRS)या योजनेअंतर्गत डॉ. एस. राधाकृष्णन पीठ यांनी, राज्यसभा फेलोशिप आणि राज्यसभा विद्यार्थी एंगेजमेंट इंटर्नशिप हा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यसभेकडून देण्यात आलेल्या सूचनेनुसार फेलोशिपसाठी 4 पदे आणि इंटर्नशिपसाठी 10 पदांची भरती केली जाईल.


कोण करू शकणार अर्ज  ?
राज्यसभा सचिवालयाने दिलेल्या सूचनेनुसार, इंटर्नशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर डिग्री असणे आवश्यक आहे. फेलोशिपसाठी उमेदवारांना संबंधित क्षेत्रात पीएच.डी. असणे आवश्यक आहे. त्यासाठी अर्ज करणारे उमेदवारांचे वय ६५ वर्षांपेक्षा कमी असावेत.


इंटर्नशिप ऑफर
राज्यसभा सचिवालयात इंटर्नशिपसाठी देण्यात आलेल्या या प्रस्तावा अंतर्गत एकूण 10 उमेदवारांना इंटर्नशिप मिळेल. निवड झालेल्या उमेदवाराला दोन महिन्यांची इंटर्नशिप मिळेल. या इंटर्नशिप कालावधीत उमेदवारांना दरमहा 10 हजार रुपये मिळतील.


फोलोशिप ऑफर
राजसभा सचिवालयात फोलोशिपसाठी एकूण 04 उमेदवारांची  निवड होईल. निवड झालेल्या उमेदवाराला 18 महिन्यांची फोलोशिप मिळेल. फोलोशिपचा अवधी 6 महिने वाढवून दिला जाऊ शकतो. यामध्ये 8 लाख रुपये वेतन आणि 50,000 रुपये अनुदान म्हणून दिले जातील. 


याबद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी https://rajyasabha.nic.in/rsnew/publication_electronic/radha_fellow.pdf या लिंकवर क्लिक करा.