COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : महाआघाडी व्हावी ही फक्त विरोधकांची नव्हे तर जनेतेचीही भावना आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. केंद्रातलं मोदी सरकार हे फक्त श्रीमंतांसाठी काम करतं, गरीबांच्या खिशातला पैसा श्रीमंतांच्या खिशात जातो, असा घणाघात राहुल गांधींनी केलाय.  मनमोहन सिंग यांच्या काळात पेट्रोलचे दर नियंत्रणात होते, आता जीएसटीअंतर्गत का नाही, असा सवालही त्यांनी केलाय... 


महाआघाडी भाजपा, पंतप्रधान आणि आरएसएस विरोधी उभी राहत आहे.


- महाआघाडी उभी रहावी ही भावना फक्त विरोधकांची नाही तर जनतेचीही आहे
- सरकार फक्त श्रीमंतांसाठी काम करते आहे
- मनमोहन सिंग यांच्या काळात पेट्रोलचे दर नियंत्रणात होते, आंतरराष्ट्रीय दर जास्त असताना
- पण आता भाव कमी केले जात नाहीत
- जनतेला कोणताही दिलासा दिला जात नाही
- हा पैसे श्रीमंताच्या खिशात जातोय