India Post Recruitment 2022: सरकारी नोकरी मिळवण्याचं अनेक तरुणाचं स्वप्न असतं. त्यामुळे स्पर्धा परीक्षेसाठी जोरदार तयारी करतात. तसेच नोकरीच्या जाहीरात प्रसिद्ध होताच अर्ज करतात. आता पोस्ट विभागात नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. गुजरात पोस्टल सर्कलमध्ये मल्टी टास्किंग स्टाफ (MTS), पोस्टमन, पोस्टल असिस्टंट आणि सॉर्टिंग असिस्टंटसह विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी dopsportsrecruitment.in या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 नोव्हेंबर 2022 पर्यंत आहे. निवड झालेल्या उमेदवारांची यादी 06 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केली जाईल. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि आसाम विभागांसाठी अधिसूचनाही लवकरच वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Educational Qualification


  • पोस्टल असिस्टंट आणि सॉर्टिंग असिस्टंट - 12वी पास उमेदवार यासाठी अर्ज दाखल करू शकतात. नियुक्ती पत्र जारी करण्यापूर्वी उमेदवारांना मान्यताप्राप्त संगणक प्रशिक्षण संस्थेतून किमान 60 दिवसांच्या कालावधीचे मूलभूत संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

  • पोस्टमन/मेल गार्ड - या पदासाठी 12 वी पास आणि स्थानिक भाषेचे (गुजराती) ज्ञान आवश्यक आहे. नियुक्ती पत्र जारी करण्यापूर्वी उमेदवारांना मान्यताप्राप्त संगणक प्रशिक्षण संस्थेतून किमान 60 दिवसांच्या कालावधीचे मूलभूत संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

  • एमटीएस - या पदासाठी दहावी पास आणि स्थानिक भाषेचे ज्ञान (गुजराती) असणं आवश्यक आहे.


Diwali Gift: दिवाळीला मिळालेल्या भेटवस्तूंवर Tax लागतो? समजून घ्या संपूर्ण गणित


-पोस्टल असिस्टंट आणि शॉर्टनिंग असिस्टंट या पदांसाठी 25,500 ते 81100 रुपये प्रति महिना पगार मिळेल.
-पोस्टमन/मेल गार्डच्या पदांसाठी 21,700 रुपये ते 69100 रुपये प्रति महिना पगार मिळेल.
-एमटीएसच्या पदांसाठी 18000 ते 56900 रुपये प्रति महिना पगार मिळेल.