Dish TV रिचार्ज करणे हे महिन्यातील खर्चातील महत्त्वाचा खर्च आहे. याबाबत सरकारने नवी स्कीम सुरु केली आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल सरकारकडून Free Dish Connection हा पर्याय दिला आहे. या सेवेच्या मदतीने तुम्ही घरात सहज डीश टीव्ही लावू शकतो. तसेच युझर्सला रिचार्ज करण्याची गरज नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डीटीएच फ्री डिशद्वारे टीव्ही प्रेमी लोकांसाठी फ्री चॅनल्स लिस्ट जाहीर केलं आहे. या यादीत अंतर्गत अनेक क्षेत्रात आणि भाषांमध्ये फ्री चॅनल पुरविले आहे. डीटीएच फ्री चॅनल लिस्ट अंतर्गत तुम्ही टीव्हीमध्ये नवे चॅनल्स डाऊनलोड करु शकता. महत्त्वाचं म्हणजे हे चॅनल्स तुम्हाला अतिशय फ्री पाहता येणार आहे. 


कसे लावू शकता डीश टीव्ही? 


DDकडून Free Dish DTH सेवेचा पर्याय दिला जात आहे. हे सार्वजनिक सेवा प्रसारक प्रसार भारती द्वारे प्रदान केले जाते आणि वर्ष 2004 मध्ये सुरू करण्यात आले होते. या सेवेचा लाभ घेतल्यानंतर, तुम्हाला फ्री-टू-एअर (FTA) डायरेक्ट-टू-होम (DTH) दिले जाते. याचा अर्थ तुम्हाला दर महिन्याला रिचार्जची काळजी करण्याची गरज नाही.


महत्त्वाचं म्हणजे एकदा गुंतवणूक करून तुम्ही ही सेवा सहज मिळवू शकता. ही सेवा घेण्यासाठी तुम्हाला एकदाच 2 हजार रुपये खर्च करावे लागतील. यानंतर कोणतेही रिचार्ज करण्याची गरज नाही. म्हणजेच तुम्हाला कायमस्वरूपी मोफत टीव्ही चॅनेल बघायला मिळतील. याशिवाय आता कॉम्पॅक्ट आकाराचा अँटेनाही उपलब्ध आहे. हे देखील खूप मोठे DTH प्लॅटफॉर्म आहे.


असे करा अर्ज?


डिशसाठी तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता. यासाठी 2 क्रमांक देण्यात आले आहेत. पहिला क्रमांक आहे- 1800114554 तर दुसरा क्रमांक- 011-25806200.. तुम्ही या क्रमांकांवर संपर्क करून माहिती मिळवू शकता. तुम्ही स्थानिक केबल ऑपरेटरच्या मदतीने यासाठी अर्ज देखील करू शकता. या प्रक्रियेचाही अवलंब केला जात आहे. रिसीव्हर स्थानिक पातळीवरही बसवता येतो. पण फी भरावी लागेल.


मात्र, यासाठी तुमच्याकडे टीव्ही असणे अनिवार्य असून त्यासाठी वेगळे शुल्क आकारले जाणार नाही. त्याची खासियत म्हणजे तुम्हाला दर महिन्याला रिचार्ज करण्याची काळजी करण्याची गरज नाही. मात्र त्यात फक्त निवडक चॅनेल दिसतील.