लॉकडाऊन- २ मध्ये सरकारकडून नियम आणखी कठोर
कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून नियम आणखी कठोर करण्यात आले आहेत.
मुंबई : देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. दरम्यान, बुधवारी केंद्रीय गृह मंत्रालयाने लॉकडाउन 2 संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून यासह कोविड -१९ च्या दृष्टीने काही वेगळ्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे नआवश्यक केले गेले आहे आणि थुंकल्यावर दंड आकारणयात येणार आहे. सरकारकडून आता लॉकडाऊन २ मध्ये आणखी कठोर नियम लावण्याच आले आहेत.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मते,
कार्यालयात, सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे आणि चेहरा झाकणे अनिवार्य आहे.
कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी ५ हून अधिक लोकांना एकत्र करू नका, याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने कठोर पाऊले उचलावी.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे दंडनीय असेल आणि दंड आकारला जाईल.
दारू-गुटखा-तंबाखूच्या विक्रीवर बंदी.
बस, ट्रेन मिळणार नाही. घरी जाण्यासाठी कुठल्याही अफवांकडे लक्ष देऊ नका. आपण जिथे आहात तिथेच रहा.
सरकारने कार्यालयांबाबत काही मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत, जेथे लॉकडाऊन दरम्यान कार्यालय अजूनही कार्यरत आहे तेथे सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
सर्व कार्यालयांमध्ये तापमान तपासणी, सेनिटायझर सुविधा असणे आवश्यक आहे.
शिफ्ट दरम्यान एक तासाचा फरक आवश्यक.
65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि ज्यांचा मुलगा ५ वर्षा पेक्षा कमी वयाचा आहे. त्यांना घरुन काम करण्याची परवानगी द्यावी.
आरोग्य सेतु App चा वापर वाढला पाहिजे.
दोन शिफ्टच्या मध्ये कार्यालयाची स्वच्छता करावी. मोठ्या बैठका टाळाव्यात.
हे पण वाचा: धोक्याची घंटा, देशात कोरोनामुळे मृत्यू झालेला प्रत्येक दुसरा व्यक्ती महाराष्ट्राचा
याखेरीज केंद्रीय गृह मंत्रालयाने उत्पादन कंपनी, कारखाने या संदर्भातही काही नियम जारी केले आहेत, ज्यात किमान लोकांची उपस्थिती, सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक आहे. कंपन्यांना सर्व कर्मचार्यांचा वैद्यकीय विमा काढण्यास सांगण्यात आले आहे.
• सॅनिटायझर, प्रवेशद्वारात स्क्रीनिंग सुविधा
• अशी सुविधा कॅफेटेरिया, कॅन्टीनमध्येही करावी.
• लिफ्ट, वॉशरूम, मीटिंग रूममध्ये सतत निर्जंतुकीकरण केले जावे.
विशेष म्हणजे बुधवारी सरकारने लॉकडाउन 2 साठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना जाहीर केले की या वेळी 3 मे पर्यंत लॉकडाऊन 2 चालू राहील.
अधिक वाचा: थंड देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी, संशोधनानुसार भारताला थोडा दिलासा