Video : रियल लाइफमधील निकुम्भ सर! सरकारी शाळेतील अनोख्या पद्धतीने शिकवतो इंग्रजी
Government Teacher Video : तुम्हाला रियल लाइफमधील निकुम्भ सरांना भेटायचं आहे. इन्स्टाग्रामवर सरकारी शाळेतील या शिक्षकाचा व्हिडीओ नक्की पाहा.
Primary School Teacher Video : तुम्हाला आमिर खानचा (Aamir Khan) तारे जमीन पर हा चित्रपट आठवतो का? या चित्रपटात आमिर खान आर्ट टीचर राम शंकर निकुम्भची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात निकुम्भ शाळेत विद्यार्थ्यांना हटके पद्धतीने शिकवताना दिसला आहे. पण हा झाला चित्रपटातील विषय, खऱ्या आयुष्यात असे शिक्षक आहेत का? असा प्रश्न अनेकांना पडतो. पण आज आम्ही तुम्हाला रियल लाइफमधील निकुम्भ सरांना भेटवणार आहेत. (government teacher Aamir Khan Nikumbha Sir in Rear Life Primary school teacher video on Instagram today viral trending news)
या शिक्षकाची शिकविण्याची अनोखी पद्धत पाहून प्रत्येक जण अवाक् आहे. त्याशिवाय या शिक्षकाकडे पाहून तो एका कुठल्याही मॉडेलला टक्कर देईल असा आहे. त्याची ड्रेसिंग स्टाइल बघून कोणी म्हणणार नाही तो एका सरकारी शाळेचा शिक्षक आहे. विशेष म्हणजे तो सोशल मीडियावरही सक्रीय आहे. त्याने सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओला आतापर्यंत 2.4 मिलिनिय व्ह्यूज मिळाले आहेत.
हा व्हिडीओ पोस्ट करताना तो म्हणाला की, प्राथमिख शिक्षक होणं सोपं नाही, पण अवघडही नाही. वर्गात अनेक गोष्टी पूर्ण करण्याची गुरुकिल्ली एका सोप्या गोष्टीपासून सुरु होते. जर तुम्हाला मुलांशी बंध घट्ट करायचा असेल तर तुम्हाला त्यांच्यासोबत वर्गात जास्त जास्त वेळ राहिला हवं. त्यांच्यासोबतच दुपारचं जेवण जेवायला हवं. मी रोज हे करतो आणि रोज नवीन विद्यार्थ्यासोबत जेवायला बसतो. जेवता जेवता त्या मुलाशी गप्पा मारतो.
त्याशिवाय माझ्या वर्गातील काही मुलं हे पाठ्यपुस्तकातून काहीच शिकत नाहीत त्यामुळे मला त्या गोष्टीचा ताण असतो. अशावेळी मी त्या विद्यार्थ्यांवर जास्त लक्ष केंद्रित करतो. दररोज त्या विद्यार्थ्यांपैकी एकाला मी स्वत:ला समर्पित करतो. हो ही प्रक्रिया एका दिवसाची किंवा एका आठवड्याची नाही, या गोष्टीला वेळ लागतो. पण दयाळू व्हा. स्वत:ला त्यांच्या जागी ठेवा.
या व्हिडीओमध्ये त्याने घरातून निघून शाळेत पोहोचल्यावर तो काय काय करतो याबद्दल सांगितलं आहे. मुलांना अनोख्या पद्धतीने शिकवण्याची पद्धत असो किंवा त्यांचा वाढदिवस साजरा करणं असो. रिअर लाइफमधील या शिक्षकाचं सोशल मीडियावर भरपूर कौतुक सुरु आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इन्स्टाग्रामच्या englishwalesirrr या अकाऊंटवर 21 ऑगस्टला पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 2.4 मिलियन व्ह्यूज मिळाले असून ही संख्या वाढत आहे.