मुंबई : आपल्याला दिवसाला अनेक मॅसेजेस व्हॉट्सअ‍ॅपवरती येत असतात. त्यात काही खरोखरचं माहिती देणारे असतात. तर काही मॅसेज खरे आहेत की, खोटे याची खात्री न करता आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो. परंतु लोकांच्या याच सवयीचा फायदा काही लोकं घेतात आणि त्यांचे आयुष्य भराचे नुकसान करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंटरनेटचा वापर आता इतका वाढला आहे की, लोकं त्याच्या शिवाय राहू शकत नाही. इंटरनेटचे जितके फायदे आहे तितके तोटे देखील आहेत. कारण इंटरनेच्या वापरामुळे सायबर क्राइम देखील वाढायला सुरवात झाली आहे. केंद्र गृह मंत्रालयाच्या सायबर दोस्त नावाच्या ट्वीटर हॅंडलवरुन लोकांना या सायबर क्राईमपासून कसे वाचायचे? आणि काय करु नये या सगळ्या गोष्टीचे ज्ञान दिले जाते. 


आता आपल्या ट्वीटर हॅडलवरुन माहिती देताना गृहमंत्रालयाने सांगितले की, सध्या हे सायबर क्राईम करणाऱ्या भामट्यांनी लोकांना KYC च्या नावाखाली फसवण्याची आता नवीन पद्धत आणली आहे. त्यामुळे यासंबंधीत माहिती कोणासोबतही शेअर करु नका असे आवाहन देखील गृहमंत्रालयाने केले आहे.


आजकाल हे फ्रॉड करणारे लोकं KYC चा SMS लोकांना करतात आणि त्याच्या नावाखाली लोकांकडून त्याची माहिती घेत आशतात. त्यामुळे गृहमंत्रालयाने लोकांना असे आदेश दिले आहेत की, अशा गोष्टींना बळी पडू नका. त्याच बरोबर तुम्हाला आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका.


जर तुम्हाला असा कोणता मॅसेज आली की, तुमची KYC अपडेट न झाल्यामुळे तुमचे बँक अकाउंट बंद होऊ शकते. तर तुम्ही लगेच त्यावर क्लिक करु नका. पहिले तुमच्या बँक शाखेला फोन करा आणि तुमच्या बँकेकडून या गोष्टीचे कंफरमेशन घ्या आणि मगच त्या लिंकवर क्लिक करा. तसेच तुमची कोणतीही माहिती फोनवरती देऊ नका.



तसेच Anydesk किंवा TeamViewer सारखे अॅप्स फोनमध्ये डाऊनलोड करु नका. कारण हे अॅप थर्ड पार्टीला तुमचा डाटा वापरण्याची संधी देतात. त्याचप्रमाणे तुमचा एटीएस पासवर्ड किंवा बँकेशी संबंधीत कोणतीही माहिती मोबाईलमध्ये सेव्ह करुन ठेऊ नका. कोणतेही मॅसज खात्री न करता गृप किंवा व्यक्तीला फॉर्वर्ड करु नका. स्वत: ही सतर्क रहा आणि लोकांनाही यापासून वाचवा.