खासगी नोकरदारांसाठी खुशखबर... मोदी सरकार देणार `ही` खास सवलत
याच पार्श्वभुमीवर आता new wage code लागू होऊ शकतो.
New Wage Code: आपल्या देशात लोकसंख्या ही प्रचंड आहे आणि त्याचसोबतच मोठा नोकरदारवर्गही आहे. त्यामुळे नोकरदारवर्गांच्या योग्य त्या गरजांची पुर्तता करण्यासाठी केंद्र सरकारला तसे नियम आखणेही बंधनकारक ठरते. याच पार्श्वभुमीवर आता new wage code लागू होऊ शकतो.
कर्मचारी वर्गासाठी सरकार लवकरच मोठा बदल आणण्याच्या तयारीत आहे. या नव्या बदलातून खाजगी कर्मचारी वर्गाला मोठा फायदा मिळू शकतो. त्याची अंमलबजावणीही कधीही करण्यात येऊ शकते.
सर्व राज्यांनी हा new wage code लागू करावा अशी केंद्र सरकारने इच्छा व्यक्त केली आहे. मात्र आजतागायत सर्व राज्यांच्या सरकारांनी त्यांच्या वतीने मसुद्याला अंतिम स्वरूप दिलेले नाही. येत्या काही महिन्यांत new wage code लागू झाला तर खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना त्याचे अनेक फायदे मिळू शकतात.
new wage code
राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी नुकतेच संसदेत सांगितले होते की बहुतांश राज्यांनी चार new wage code मसुदा पाठवला आहे. उर्वरित राज्ये ते तयार करण्याच्या तयारीत आहेत. wage, social security, industrial relations,occupational security अशा चार तत्वांवर हा new wage code आधारित आहे. हा कोड मंजूर झाला तर खाजगी कर्मचाऱ्यांना फायदा होऊ शकतो.
पगारात बदल
कोणत्याही कर्मचाऱ्याचा मूळ पगार त्याच्या एकूण पगारापेक्षा ५० टक्के किंवा त्याहून अधिक असावा अशी तरतूद सरकारने नव्या नियमात केली आहे. जर तुमचा मूळ पगार जास्त असेल तर तुमचा पीएफ फंड पूर्वीपेक्षा जास्त असेल. सरकारच्या या तरतुदीचा कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या वेळी खूप मोठा फायदा होईल. जेव्हा त्यांना याची मोठी रक्कम मिळेल तेव्हा ग्रॅच्युइटीचे पैसेही अधिक मिळतील.
साप्ताहिक सुट्टीत हा बदल...
तुम्हाला चार दिवस काम आणि आठवड्यातून तीन दिवस सुट्टी दिली जाईल परंतु ऑफिसमध्ये तुमचा कामाचा वेळ वाढेल. हा नियम लागू झाल्यानंतर तुम्हाला कार्यालयात 12 तास काम करावे लागेल. म्हणजेच तुम्हाला आठवड्यातून 48 तास काम करावे लागेल. यानंतर तुम्हाला तीन दिवसांची रजा मिळेल.
रजा कश्या असतील
यापूर्वी कोणत्याही संस्थेत दीर्घकालीन रजा घेण्यासाठी वर्षातून किमान 240 दिवस काम करणे आवश्यक होते परंतु new wage code लागू झाल्यानंतर कर्मचारी 180 दिवस काम केल्यानंतर रजेवर जाऊ शकतात.