नवी दिल्ली : तुम्ही गाडी घेण्याबद्दल विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे... त्यातही तुम्ही इलेक्ट्रिक गाडी घेण्याचा विचार करत असाल तर दुधात साखर... कारण, मोदी सरकारनं ई-व्हेईकलला (e-vehicle) प्रोत्साहन देण्यासाठी एक मोठा निर्णय जाहीर केलाय. सरकारनं घेतलेल्या निर्णयानुसार, तुम्ही ई व्हेईकल विकत घेतली तर तुम्हाला त्यासाठी रजिस्ट्रेशन फी द्यावी लागणार नाही. इतकंच नाही तर तुम्ही ई व्हेईकलची नोंदणी पुन्हा करत असाल तरीही तुम्हाला रजिस्ट्रेशन फी द्यावी लागणार नाही.


ई व्हेईकलला प्रोत्साहन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॅटरी ऑपरेटेड वाहनांवर रजिस्ट्रेशन फी संपवून सरकारन देशात इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन दिलंय. अशा वाहनांवर रजिस्ट्रेशन शुल्क हटवण्यावरून रस्ते परिवहन मंत्रालयानं ड्राफ्ट नोटिफिकेशनही जारी केलंय. नव्या नियमानुसार, सर्व प्रकारच्या इलेक्ट्रीक गाड्या मग त्या दोन चाकी असो तीन चाकी किंवा चार चाकी... बॅटरी ऑपरेटेड वाहनांच्या खरदीवर यापुढे रजिस्ट्रेशन फी द्यावी लागणार नाही. 


मोदी सरकारच्या टॉप अजेंड्यात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचाही समावेश आहे. देशात २०२३ पर्यंत थ्री व्हिलर आणि २०२५ पर्यंत टू व्हिलर ई व्हेईकलचीच विक्री व्हावी, अशीही सरकारची इच्छा आहे.



पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या सूचनेनुसार, देशात सर्व इलेक्ट्रीक थ्री व्हिलरवर नंबर प्लेट अनिवार्य केली जाईल. रस्ते परिवनह मंत्रालयानं ई व्हेईकल थ्री व्हिलरच्या नंबर प्लेटला हिरवा आणि सफेद रंग असायला हवेत, असे आदेश अगोदरच दिलेत.