Atal Pension Yojna: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दाखल झालेले एनडीए सरकार 23 जुलै रोजी सर्वसाधारण अर्थसंकल्प (Budget 2024) मांडणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांचे लक्ष बजेटवर आहे. या बजेटमध्ये सर्वसामान्यांना काय दिलासा मिळणार कोणत्या घोषणा होणार, याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. यंदा अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा होऊ शकतात, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सरकार अटल पेन्शन योजनेबाबतही काही बदल करण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकार अटल पेन्शन योजनेत काही दिलासादायक बदल करु शकतात. जेव्हा 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर झाला होता. तेव्हा अटल योजनेबाबत काही संकेत देण्यात आले होते. त्यामुळं या अर्थसंकल्पात Atal Pension ची रक्कम दुप्पट केली जाऊ शकते. त्यामुळं, सर्वसामान्य नागरिकांनाही यावेळी सरकारकडून आशा आहे. 


10,000 रुपये होऊ शकते पेन्शन


अटल पेन्शन योजना (APY Scheme) बाबत अर्थसंकल्पाकडून खूप आशा आहेत. केंद्र सरकार अर्थसंकल्प सादर करताना अटल पेन्शन योजनेच्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या पेन्शनची व्याप्ती वाढू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या या योजनेअंतर्गंत 5 हजार रुपयांपर्यंतची पेन्शनची रक्कम मिळते. ही रक्कम वाढून 10 हजारांपर्यंत केली जाऊ शकते. सध्या या प्रस्तावावर विचार करण्यात येत आहे. 


नवीन सरकार स्थापन होण्याच्या आधी 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम बजेट सादर करण्यात आले होते. या बजेटमध्येही अटल पेन्शनबाबत घोषणा करण्यात येईल, अशी शक्यता होती. मात्र तसे काही झालं नाही. अशातच सर्वसमावेशक बजेटमध्ये अटल पेन्शनबाबत काही घोषणा होऊ शकते, अशी शक्यता आहे. इंडिया टुडेने एका रिपोर्टमध्ये दिलेल्या सूत्राच्या हवाल्याने म्हटलं आहे की, केंद्र अटल पेन्शन योजनेतील पेन्शनची रक्कम वाढवू शकते. पेंशन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA)चे चेअरमन दीपक मोहंती यांनी केंद्राकडून या योजनेची रक्कम वाढवण्यास नकार दिला होता. 


केंद्र सरकारने अटल पेन्शन योजनाचे सुरुवात आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये केली होती. यात 5000 रुपयांपर्यंतची पेन्शन मिळते. 18 ते 40 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील सर्व भारतीय या योजनेसाठी पात्र आहेत. या सरकारी योजनेत गुंतवणुक केल्यानंतर गँरटीट पेन्शनसोबतच अनेक फायदे मिळतात. यात गुंतवणूक केल्यास तुम्हाला 1.5 लाखपर्यंतचा कर वाचवता येईल. ही कर सवलत कलम 80 C अंतर्गंत दिली जाते. 20 जून पर्यंत अटल पेन्शन योजनेत एकूण 6.62 कोटी लोकांनी खाते उघडले आहे. तर, यात 5.3 कोटी ग्राहकांनी गुंतवणूक केली आहे.