मुंबई : Vodafone Idea ने मंगळवारी माहिती दिली की, सोमवारी झालेल्या बोर्डाच्या बैठकीत कंपनीच्या थकीत स्पेक्ट्रम लिलावाच्या हप्त्यांमधील संपूर्ण व्याजाची रक्कम आणि थकीत AGR इक्विटीमध्ये कन्वर्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कन्वर्जननंतर प्रवर्तकासह कंपनीच्या सर्व विद्यमान भागधारकांचा हिस्सा डायल्युट होईल. त्यानुसार सरकार व्होडाफोन आयडियामध्ये एक तृतीयांश हिस्सा घेणार आहे. या व्याजाचा NPV अंदाजे 16,000 कोटी रुपये आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीच्या शेअर्सची सरासरी किंमत 14 ऑगस्ट 2021 च्या च्या किंमतीपेक्षा कमी होती. त्यामुळे सरकारला 10 रुपये प्रति शेअरपेक्षा जास्त किंमतीच्या शेअर्सचे वाटप केले जाईल. हा प्रस्ताव दूरसंचार विभागाच्या मान्यतेच्या अधीन आहे. या कन्वर्जननंतर व्होडाफोन आयडियामध्ये सरकारची हिस्सेदारी सुमारे 36 टक्के होईल.


व्याजाच्या बदल्यात 10 रुपये प्रति शेअर दराने शेअर जारी करेल. मोरेटोरियमचे व्याज सुमारे 16,000 कोटी रुपये असेल. सरकारने कंपन्यांना इक्विटीऐवजी मोरेटोरियमचा पर्याय दिला होता. या अंतर्गत कंपनी सरकारला 35 टक्क्यांहून अधिक इक्विटी देणार आहे. कंपनीतील प्रवर्तकांचे शेअरहोल्डिंग 46.3 टक्क्यांपर्यंत खाली येईल. सरकार कंपनीमध्ये स्वतःचे संचालक मंडळ नियुक्त करेल.


व्होडाफोन आयडियामध्ये सरकारने हिस्सा घेतला असला तरी कंपनीबाबत अनेक प्रश्न आहेत. यामुळे बाजार उघडताच कंपनीचे शेअर्स 10% पेक्षा जास्त घसरले.