GQG Partners: अदानींच्या मदतीला देवदूत, महिन्याभर सुरू असलेली घसरगुंडी सावरेल का?
GQG Partners Buys Adani Share: अदानींची घसरण सुरू असताना आता गौतम अदानींची मदत करायला देवदूत (Rajiv Jain Gautam Adani) आले आहेत. त्यांच्या मदतीला निघून येताना त्यांनी अदानींच्या तीन कंपन्यांचे शेअर्स विकत घेतले आहेत. ही गुंतवणूक (Investment) कोणी केली? जाणून घेऊया.
GQG Partners Buys Adani Share: गेल्या महिना दोन महिन्यांपासून भारतीय उद्योगपती सर्वत्र गटांगळ्या खाताना दिसत आहेत. हिंडनबर्गच्या (Hindenberg Report) एका अहवालामुळे त्यांच्या संपुर्ण संपत्तीवरच गदा आली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीतून गौतम अदानी टॉप 30 (Gautam Adani Top 30) च्याही बाहेर गेले आहेत. त्यातून त्यांची संपत्तीही मोठ्या प्रमाणात कोसळली आहे. त्यांच्या शेअर्समध्येही (Shares) मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या विश्वासाहर्ताही कमी झाली आहे. त्यामुळे पुन्हा अदानींच्या शेअरमध्ये कोणी गुंतवणूक (Investment) करेल याची क्षमता फारच कमी असल्याची दिसून येते आहे. (gqg partners invests in adani shares including other indian companies who is rajiv jain read the full article)
त्यात आता इतक्या मोठ्या संकटातून बाहेर येणंही अदानींसाठी फार कमी दिसत असताना त्याचसोबत अदानी या यादीच्या बाहेर जाण्याची शक्यता असताना आता त्यांच्या मदतीला चक्क एका भारतीय व्यक्तीची साथ मिळाली आहे. हिंडनबर्गच्या रिपोर्टनंतर, गौतम अदानींसोबत (GQG Partners) असलेली डील अनेकांनी काढूनही टाकली आहे. त्यातून अशाच एका माणसानं राजदूत बनत मात्र त्यानं अदानींचे शेअर विकत घेतले आहेत. नक्की कोणती आहे ही कंपनी? कोण आहेत या कंपनीचे मालक (How is Rajiv Jain), जाणून घेऊया या लेखातून.
समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, या कपंनीचे नाव आहे जीक्यूजी पार्टनर्स या राजीव जैन यांच्या कंपनीनं अदानी एन्टरप्राईजेजमध्ये 3.4 टक्क्यांचा हिस्सा घेत 5460 कोटी रूपये अदानींना दिले आहेत. हा हिस्सा झाला अदानी एन्टरप्राईजचा. या कंपनीनं अदानी पोर्ट्समध्ये (Adani Ports) 4.1 टक्क्यांचा हिस्सा घेतला असून त्यानुसार 5282 कोटी रूपयांची शेअर विकत घेतले आहे. त्याचसोबत अदानी ट्रान्समिशनमध्ये (Adani Transmission) 2.5 टक्के गुंतवणूक म्हणजेच 1898 कोटी रूपयांची आणि अदानी ग्रीन एनर्जीमध्ये (Adani Green Energy) 3.5 टक्क्यांची म्हणजेच 2806 कोटी रूपयांचे शेअर विकत घेतले आहेत.
उद्योगपती राजीव जैन यांनी 2016 मध्ये जीक्यूजी पार्टनर्स ही कंपनी सुरू केली. ही फर्म ऑस्ट्रेलियामध्ये रजिस्टर्ड (Australia Based Investment Firm GQG Partners) आहे. ही एक इन्व्हेसमेंट फर्म आहे. अदानींच्या कंपनीशिवाय या कंपनीनं ITC, RIL, ICICI BANK, SBI, SUN Pharma, Infosys, Bharti Airtel, Tata Steel, HDFC AMC, JSW Steel यांसारखी नावंही आहेत.
अदानी यांच्या कंपन्या या भारतात आणि जगभरात बांधकाम मुलभूत सुविधा (Infrastructure Assets) देणारी कंपनी आहे. त्यामुळे आमचा असा विश्वास आहे की या कंपन्या दीर्घकालीन विकासासाठी मदत करू शकतात. सध्या अदानींच्या कंपन्या गटांगळ्या खात असताना आता अदानी यांची कंपनी सावरणार का? असा प्रश्नही सगळ्यांसमोर येतो आहे.