नवी दिल्ली : आतापर्यंत आपण  ATMमधून फक्त पैसे काढत होतो. पण आता आपल्याला ATMमधून धान्य देखील काढता येणार आहे. देशातला पहिला  'ग्रेन एटीएम' (Grain ATM) गुरुग्राममध्ये पायलट प्रोजेक्ट स्वरूपात सुरू करण्यात आला आहे. या मशीनमधून एकावेळेस अवघ्या पाट ते सात मिनिटांत तब्बल 70 किलो धान्य काढता येणार आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री दुष्यंत चौटाला (Dushyant Chautala) यांनी सांगितलं की, ग्राहकांना आता धान्य  घेण्यासाठी सरकारी शिधावाटप दुकानांसमोर रांगा लावण्याची गरज नाही. कारण गाहकांना आता  'ग्रेन एटीएम' धान्य  उपलब्ध करून देणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माफियांना आळा बसेल काय?
हरियाणाच्या गुरूग्राम जिल्ह्यात पहिल्यांदा पायलट प्रोजेक्ट्च्या माध्यमातून देशातील पहिला 'ग्रेन एटीएम' (Grain ATM) सुरू करण्यात आला आहे. चौटाला यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा विभागाचीही जबाबदारी आहे.  दुष्यंत चौटाला यांनी सांगितलं की, ''ग्रेन एटीएम'मुळे रेशनच्या प्रमाणात आणि वेळेचे अचूक मोजमाप संबंधित सर्व तक्रारींचे निवारण केले जाईल.'


'ग्रेन एटीएम'मुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. पण शिधावाटप दुकानांमध्ये धान्य उपलब्ध आहे की नाही, ग्राहकांची ही चिंता देखील दूर होणार आहे. पूर्वीच्या तुलनेत सार्वजनिक अन्न वितरण प्रणालीत अधिक पारदर्शकता येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की गुरुग्राम जिल्ह्यातील फर्रुखनगर येथे हा पायलट प्रकल्प यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर राज्यभरातील सरकारी शिधावाटप दुकानांमध्ये 'ग्रेन एटीएम' बसविण्याची योजना आहे.