भारतात लग्न म्हंटलं एक आनंद सोहळा असतो. नातेवाईक एकत्र येत आनंदात सहभागी होतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नाचायला खूप आवडतं. त्यामुळे लग्नाला आलेले नातेवाईक आवर्जून नृत्यात सहभागी होतात. भारतात लग्न असलं आणि नागिन डान्स नसला तर त्या काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. असाच एका नागिन डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात एक आजी आपल्या नातवासोबत धमाल नागिन डान्स करताना दिसत आहे. नातू रुमालाने पुंगी वाजवताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत एक मुलगा रुमालाची पुंगी बनवून नाचताना दिसत आहे. नातवाची कृती पाहून आजीला राहावत नाही आणि आजी नातवाच्या पुंगीवर ठेका धरताना दिसते. आजीचा जोरदार डान्स पाहून आसपासचे लोकंही आनंदी होतात. 


 



आजीचा नागिन डान्स सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत २६ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर युजर्स या व्हिडीओखाली मजेशीर कमेंट्स करत आहेत. अनेक युजर्संनी आजीच्या नृत्याचं कौतुक केलं आहे. एका युजर्सनी लिहिलं आहे की, या वयात इतका सुंदर डान्स करणं खरंच कठीण आहे.