नवी दिल्ली : दसरा, दिवाळी अगदी काही दिवसांवर येवून ठेपले आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे ई-कॉमर्स कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी डिस्कांऊट ऑफर देत आहेत. यात ऑनलाईन बाजारात आघाडीवर दिसत आहे. फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉन या कंपन्या देखील त्यांच्या ग्राहकांना सणांच्या मूहुर्तावर अनेक नव्या ऑफर देत असतात. आता देखील ऍमेझॉन कंपनी Great Indian Festival Offers तर फ्लिपकार्ड कंपनी  the Big Billion Days sale घेवून येणार आहे. या दोन्ही कंपन्या सेलच्या तारखा देखील लवकरच जाहीर करणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऍमेझॉनकडून होम आणि किचनमधील वस्तूंवर ६० टक्के सूट मिळणार असून कपडे आणि ऍक्सेसरीजवर ७० टक्के, खाद्यपदार्थांवर ५० टक्के आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ७० टक्के सूट देणार आहे. त्यामुळे ग्राहकांना सणांच्या दिवशी त्यांच्या घरासाठी नव्या वस्तू  कमी दरात विकत घेता येण शक्य होणार आहे. 


जर तुम्ही ऍमेझॉनवर एचडीएफसी बँक कार्डने खरेदी करत आहात तर तुम्हाला दहा टक्के त्वरित सूट मिळेल. याशिवाय तुम्ही फ्लिपकार्टवर एसबीआय कार्डद्वारे खरेदी करत आहात तर तुम्हाला दहा टक्के त्वरित सूट मिळेल. इतरही सुविधा ग्राहकांना मिळणार आहेत. 


Amazon आणि Flipkartच्या  या ऑफरमध्ये तुम्हाला एक्सचेंज ऑफर, नो कॉस्ट ईएमआय सारख्या सुविधा देखील मिळणार आहेत. जर तुम्ही Amazon चे प्राईम मेंम्बर आणि  Flipkartचे प्लस मेंम्बर आहात तर तुम्हाला शॉपिंगसाठी प्रथम प्राधान्य दिलं जाईल.