श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून होणारे ग्रेनेड हल्ले थांबण्याचं काही नाव घेईनात... श्रीनगरमध्ये शनिवारी सीआरपीएलच्या एका गाडीवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. यामध्ये तीन जवान गंभीररित्या जखमी झालेत... तर जखमींमध्ये एका नागरिकाचाही समावेश आहे. हा हल्ला श्रीनगरच्या फतह कदाल भागात झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी ८२ बटालियनला ग्रेनेडच्या निशाण्यावर घेतलं. यामध्ये तीन जवान जखमी झाले. जखमींना जवळच्याच हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय.  



आजचा ग्रेनेड हल्ला ज्या भागात झाला त्याच भागात शुक्रवारी सुरक्षा दलाच्या वाहनाच्या खाली एक तरुण आला होता... या तरुणाचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला होता. त्याच्या अंत्यविधीदरम्यान काही ठिकाणी हिंसक घटनाही घडल्या होत्या. 


उल्लेखनीय म्हणजे, रमजान महिन्यात काश्मीरमध्ये शांतता नांदावी यासाठी भारतीय सुरक्षा दलाकडून सीजफायरची घोषणा करण्यात आलीय.... तर दुसऱ्या बाजुनं दहशवताद्यांकडून सुरक्षा दलावर सतत हल्ले सुरुच आहेत. शुक्रवारीही वेगवेगळ्या भागांत पाच ग्रेनेड हल्ले करण्यात आले. या पाचही हल्ल्यांची जबाबदारी जैश - ए - मोहम्मद या संस्थेनं घेतलीय.