Jammu and Kashmir : जैशच्या दहशतवाद्यांना अटक; ग्रेनेड, रोकड जप्त
मागील काही दिवसांपासून ...
श्रीनगर : सोमवारी Jammu and kashmir जम्मू आणि काश्मीर येथे एका मोठ्या कारवाईत जैशच्या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. कुपवाडा येथे ही कारवाई झाली. हँड ग्रेनेड आणि साडेतीन लाखांची रोकड घटनास्थळावरुन जप्त करण्यात आली. एएनआय या वृत्तसंस्थेने पोलीसांकडून मिळालेल्या माहितीचिया आधारे हे वृत्त प्रसिद्ध केलं.
मागील काही दिवसांपासून जम्मू काश्मीर भागात दहशतवादविरोधी कारवायांना सुरुवात झाली होती. ज्यामध्ये बऱ्याच दहशतवद्यांना कंठस्नान घालण्यात सैन्याला यश आलं होतं. 19 नोव्हेंबरला नगरोटा येथे झालेल्या एका कारवाईत सैन्यानं चार दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.
सैन्याच्या त्या कारवाईमध्ये 11 AK-47s rifles, 3 पिस्तुल, 29 ग्रेनेड आणि आणखी काही गोष्टी जप्त करण्यात आल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कारवाईची प्रशंसा केली होती.
दरम्यान, सध्याच्या घडीला जम्मू काश्मीरमध्ये District Development Councils च्या निवडणुका पहिल्यांदाच पार पडत आहेत. आठ सत्रांमध्ये असणारी ही निवडणूक 19 डिसेंबरला संपणार आहे. तर, 22 डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. हे सर्व चित्र पाहता दहशतवादी कारवायांलरही सुरक्षा यंत्रणांची नजर असणार आहे. ज्याअंतर्गत विविध भागांत सैन्याची करडी नजर असल्याचं पाहायला मिळत आहे.