`धोपटुंगीच ना..`; भर लग्नात नवरदेव दुसऱ्याच मुलीसोबत..., पाहून नवरी हडबडली
भर लग्नात नवरदेव दुसऱ्याच मुलीसोबत..., व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, `धोपटुंगीच ना..`
मुंबई : लग्न म्हटलं की घरात सर्वत्र आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतं. लग्न घरात फक्त लहान मुलचं नाही ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत प्रत्येक जण खास क्षणांचा आनंद घेत असतो. सध्या लग्नसराई सुरू असून सोशल मीडियावर अनेक डान्सचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. याच दरम्यान, सोशल मीडियावर आणखी एक डान्स व्हिडिओ समोर आला आहे.
ज्यामध्ये नवरा मुलगा नवरीसोबत नाही, तर दुसऱ्याचं मुलीसोबत ठेका धरताना दिसत आहे. पतीला लग्नाच्या दिवशीचं दुसऱ्या मुलीसोबत डान्स करताना पाहून नवरी हडबडली. व्हिडीओ पाहून तुम्हालाही आवरणार नाही हासू...
सध्या नव्या नवरा-नवरीचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नवरीच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे आहेत. व्हिडीओवर अनेकांच्या कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.