Trending News: लग्न म्हणजे दोन जीवाचं मिलन नव्हे तर एका लग्नामुळं दोन कुटुंबदेखील एकत्र येत असतात. लग्नाच्यावेळी संपूर्ण घर नातेवाईकांनी भरलेले असते. लांबचे नातेवाईकदेखील या शुभप्रसंगी सहभागी होतात. तसंच, मुलांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. त्यामुळं सहाजिकच वधु-वर नातेवाईकांसोबतही जोडले जातात. हल्ली लग्न सोहळ्याचा ट्रेंड बदलत चालला आहे. मात्र, अजूनही काही असे नातेवाईक असतात ज्यांना लग्नसोहळ्यातील हा ट्रेंड पचवणे अवघड असते. असाच एक प्रकार उत्तरप्रदेशमधील लग्नसोहळ्यात घडला आहे. नवरदेवाने केलेल्या एका कृतीमुळं नातेवाईक व वधुच्या घरातले चांगलेच संपातले आहेत. त्यानंतर लग्नसोहळ्यातील परिसर एका क्षणात कुस्तीचा आखाडा बनला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशच्या हापुडा जिल्ह्यात दोन बहिणींची लग्न आयोजित केली होती. मात्र, लग्न सोहळा सुरू असतानाच वऱ्हाडी आणि वधुच्या नातेवाईकांमध्ये एकच गोंधळ माजला. दोन्ही पक्षातील लोकांनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेत काही लोक जखमी झाले तर काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दोन्ही पक्षातील सात लोकांना ताब्यात तुरुंगात डांबले. हा तणाव व गोंधळानंतर वधुचे वरात रवाना झाली. 


अशोक नगर येथे दोन बहिणींचे लग्न होते. लग्न लागल्यानंतर नवरदेवाने वधुला किस केले. हे पाहून वधुपक्षातील लोक नाराज झाले आणि त्यांनी वरपक्षाला यावरुन जाब विचारले. त्यानंतर हळुहळु दोघांमध्ये वाद वाढत गेला आणि मांडवातच एकमेकांना मारहाण करु लागले. काही जण काठ्या घेऊन मारत होते तर काही जण खुर्च्या फेकुन मारत होते. या हल्ल्यात वधुचे वडिलही जखमी झाले. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांना बोलवण्यात आले. पोलिसांनी दोन्ही पक्षातील सात जणांना तुरुंगात टाकले आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन बहिणींचे लग्न एकाच दिवशी आहे. त्यातील मोठ्या मुलीचे लग्न शांततेत पार पडले. मात्र, लहान बहिणीचे लग्न लागत असतानाच नवरदेवाने वधुला किस केले. हीच गोष्ट वधुच्या कुटुंबीयांना खटकली आणि बघता बघता लग्न मंडपातच कुस्तीचा आखाडा बनला. घटनास्थळी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काहीजणांना ताब्यात घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


हापुड एसएसपी राजकुमार अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री जवळपास दीड वाजण्याच्या सुमारास एक फोन आला. त्यानंतर पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले. पाच लोकांना रुग्णालयात दाखल केले. अद्याप या प्रकरणी कोणीही तक्रार केलेली नाहीये. पोलिसांनी म्हटलं आहे की, अशोक नगर परिसरात दोन बहिणींचे लग्न होते. मोठ्या बहिणीचे लग्न शांततेत झाले तर लहान बहिणीचे लग्न सुरू असतानाच नवरदेवाने वधुला किस केले त्यामुळं मोठा गोंधळ निर्माण झाला होता.