Groom Playing Ludo with Friends during Wedding Ceremony : आता लग्न सोहळ्यांचा काळ सुरु झाला आहे. सगळीकडे लगीन घाई सुरु झाली आहे. अशात सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असल्याचं आपण पाहतो. त्यात आता सगळ्यात जास्त चर्चा कसली असेल तर ती म्हणजे लग्नातील एका फोटोची. आता तुम्हाला वाटत असेल की हा फोटोची लग्नाच्या वरातीत नाचणाऱ्या लोकांचा आहे. पण तसं नसून हा फोटो नवऱ्या मुलाचा आहे. स्वत: नवरा मुलगा हा मंडपात बसून लूडो खेळताना दिसत आहे. हे पाहून लोकं हैराण झाले आहेत आणि त्यांना हसू अनावर होत आहे. कारण लग्नाच्या सगळ्या विधी सुरु असताना कोणी कसं काय लूडो खेळू शकतं असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवरा मुलगा हा त्याच्या काही मित्रांसोबत मंडपात लुडो खेळताना दिसत आहे. हा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका नेटकऱ्यानं शेअर केला आहे. या फोटोत नवरा मुलगा हा मंडपात असून हे बंगाली लग्न असल्याचं दिसत आहे. नवरी मुलीची प्रतीक्षा करत असताना नवरा मुलगा हा थेट लुडो खेळू लागला आहे. खरंतर नवरी मुलगी आली नसली तरी देखील काही विधी या सुरु आहेत. हा फोटो शेअर करत त्या नेटकऱ्यानं कॅप्शन दिलं की बाबा, याच्या प्रायॉरिटीज काही वेगळ्याच आहेत. हा फोटो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. 



हेही वाचा : दीपिकानंतर आता 'प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्रीच्या मुलीच्या नावाची चर्चा, पण अर्थ काय?


दरम्यान, नवऱ्या मुलाचा हा फोटो पाहता त्याच्या चेहऱ्यावर तो लुडो खेळताना किती गंभीर आहे हे दिसून येत आहे. तर त्याच्यासोबत त्याचे मित्र देखील पूर्ण लक्ष देऊन लुडो खेळत आहेत. अनेक नेटकरी यावर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'याचं खरं लक्ष हे लग्न करण्याकडे नाी तर लुडो खेळण्याकडे आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'काही झालं तरी लुडो थांबायला नको.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'अखेर टाईमपास करण्यासाठी काही करावं तर लागेल.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'आता तर हद्दच पार झाली आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'नवरा मुलगा हा लुडो लवर आहे.' इतर नेटकऱ्यांनी खाली हसण्याची इमोजी शेअर केले आहेत.