नव्या नवरीसोबत गोलीगत धोका! तारीख ठरली, मंडप सजला, पण लग्नाच्या एक दिवस आधी...
groom runs away before wedding : लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. गुरुवारी लग्न होणार होते. मंडप सजला...मेंहदीचा कार्यक्रम पुर्ण झाला. पण लग्नापूर्वी...
Crime News: लग्नाशी संबंधित अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत (Social Media Viral Video) असतात. त्याचबरोबर लग्नाच्या मंडपातील बातम्याही समोर येत असतात. असंच एक प्रकरण सध्या हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यातून समोर आलंय. जिथं लग्नाच्या एक दिवस आधी नव्या नवऱ्याने गोलीगत धोका दिला. त्यामुळे आता परिसरात एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
समोर आलेल्या माहितीनुसार, राहुलचं लग्न (Marriage) सोनीपत जिल्ह्यातील अहिर माजरा गावातील एका मुलीसोबत (Wedding Bride) ठरलं. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. गुरुवारी लग्न होणार होते. मंडप सजला...मेंहदीचा कार्यक्रम पुर्ण झाला. बायकांची लगबग सुरू झाली. लग्नापूर्वी राहुल त्याच्या मोठ्या बहिणीला बाईकवर बसवून धरुहेरा येथील ब्युटी पार्लरमध्ये साडेदहा वाजता घेऊन गेला.
बहिणीला ब्युटी पार्लरमध्ये सोडल्यानंतर तो मित्राकडे जातो, असं सांगून निघून (groom runs away) गेला. गेलो तो गेला.. परत आलाच नाही... घरचे सगळे वाट पाहत होते. पण नवरदेव गायब. राहुलचा सर्वत्र शोध घेतला, मात्र त्याचा पत्ता लागला नाही.
आणखी वाचा - ...अन् कारने बाईकला तब्बल 1 किलोमीटर फरफटत नेलं, VIDEO पाहून तुम्हीही हादराल!
दरम्यान, त्यानंतर प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं. पोलिसांनी शोधाशोध सुरू केली. इकडे लग्नमंडपात सर्वजण वाट पाहत होते. मात्र, गडी गायब... मग नवरदेवाच्या जागी त्याच्या भावाला (Younger Brother) उभं केलं आणि पंडित मंत्र म्हणून मोकळे झाले. या घटनेनंतर गावभर एकच चर्चा होताना दिसत आहे.