मुंबई: लग्नाची वरात घेऊन कोणी घोडीवर येतं तर कोणी भल्यामोठ्या गाडीतून. शाही लग्नात तर हेलिकॉप्टरमधून देखील मुलीची पाठवणी करण्याचे किंवा मुलीच्या एन्ट्रीसाठी हेलिकॉप्टर आणण्याचं फॅड आलं आहे. मात्र गाडी, घोडा ना हेलिकॉप्टर चक्क एका तरुणानं अजब जुगाड केला आहे. या तरुणाच्या जुगाडची तुलना लोकांनी बॉलिवूडच्या सिनेमासोबत केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवरदेवाने लग्न मंडपात चक्क वधूसोबत सायकल रिक्षामधून एन्ट्री केली आहे. एखाद्या सीरियलमध्ये किंवा सिनेमातील सीनमध्ये दाखवावं अगदी तशाच पद्धतीनं ही ग्रॅण्ड एन्ट्री दोघांनी घेतली. सायकल रिक्षाला फुलांनी सजावट केली होती. यामध्ये बसून दोघंही लग्नमंडपात आले आहेत. या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


या व्हिडीओच्या बॅग्राऊंडला धूम मचाले धूम गाणं वाजत आहे. द वेडिंग स्टोरिज नावाच्या इन्स्टा अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 16 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर काही युझर्सनी या व्हिडीओचं कौतुक करत फिल्मी एन्ट्री असल्याचं म्हटलं आहे.