श्रीहरिकोटा :  २९ मार्चला संध्याकाळी ४.३६ वाजता भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो जीएसएलव्ही एमके २ या प्रक्षेपकाद्वारे जीसॅट - ६ ए हा संदेशवहन उपग्रह  ३६ हजार किमी उंचीवर भूस्थीर कक्षेत धाडणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जीसॅट - ६ ए हा उपग्रह ऑगस्ट २०१५ ला पाठवण्यात आलेल्या जीसॅट - ६ चा जुळा भाऊ आहे. २१४० किलो वजनाच्या जीसॅट -६ ए चा कार्यकाल १० वर्षांचा असून याचा वापर मुख्यतः लष्कराच्या संदेशवहनासाठी केला जाणार आहे.


 यासाठी उपग्रहाला एक छोटी छत्री असणार आहे जी नियोजीत कक्षेत गेल्यावर उघडेल. या विशिष्ट छत्रीमुळे देशातील कुठल्याही भागांतून लष्कराला कधीही संदेशवहन करणे शक्य होणार आहे.