नवी दिल्ली : जीएसटीमुळे मोदी सरकारला मोठा फायदा झाला आहे. रिपोर्टनुसार, सप्टेंबर पेक्षा ऑक्टोबरमध्ये सरकारच्या तिजोरीत जास्त पैसा जमा झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारचे उपमुख्यमंत्री आणि जीएसटी काउंसिल मधील मंत्र्यांच्या समुहाचे अध्यक्ष सुशील मोदी यांनी माहिती दिली आहे की, ऑक्टोबरमध्ये महसूलच्या रूपात 95,131 कोटी जमा झाले होते. देशात जीएसटी जुलैपासून लागू आहे आणि ऑक्टोबरमध्ये सरकारच्या तिजोरीत आलेली रक्कम मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ऑक्टोबरमध्ये 2000 कोटींनी महसूल वाढला आहे.


सुशील मोदी यांनी सांगितलं की, राज्यातील महसूलातील सरासरी घट कमी होऊन 17.6 टक्क्यांवर आली आहे. जीएसटीनुसार सप्टेंबर महिन्यात सरकारला 93,141 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. सर्व राज्यांचा महसूलातील सरासरी घट ऑगस्ट महिन्यात 28.4 टक्के होती. जी ऑक्टोबरमध्ये कमी होऊन 17.6 टक्के झाली आहे.


हे एक चांगले संकेत असल्याचं त्यांनी म्हटलंय. अर्थव्यवस्था हळूहळू स्थिर होत असल्याचं दिसत आहे. मूल्याच्या आधारावर ऑगस्टमध्ये राज्यांच्या महसुलातीस सरासरी घट 12,208 कोटी रुपये होती जी ऑक्टोबरमध्ये 7,560 कोटी झाली.