नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये आज रात्री १२ वाजल्यापासून वस्तू आणि सेवा कर (GST) लागू केला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जम्मू-काश्मीर विधानसबेत जीएसटी विधेयक लागू होणार असल्याची माहिती गुरुवारी दिली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेटली यांनी या 'ऐतिहासिक' सुधारणेच्या कल्पनेचं श्रेय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सरकारलाही दिलं... काँग्रेसनं ही कल्पना पुढे सरकवली, अशी पुश्तीही त्यांनी जोडली. 


भाजप कार्यकर्त्यांसमोर बोलताना जेटली यांनी २००३ मध्ये वाजपेयी सरकारद्वारे गठित करण्यात आलेल्या समितीनं जीएसटीची संकल्पना मांडली होती, असं म्हटलंय. त्यानंतर सरकार बदललं आणि नवीन अर्थमंत्री बनलेल्या पी चिदंबरम यांना यात काही चांगल्या गोष्टी दिसल्या... त्यानंतर त्यांनी जीएसटी लागू करण्यासाठी २०१० चं लक्ष्य ठेवलं होतं... परंतु, त्यांना हे जमलं नाही, असंही जेटलींनी म्हटलंय.