नवी दिल्ली : जीएसटी काउंसिलने वेगवेगळ्या सर्व्हिसेसवर 4 वेगवेगळ्या  स्लॅबमध्ये टॅक्स लावण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण आणि आरोग्य यावर नवीन कर प्रणालीत कोणताही टॅक्स नाही लागणार आहे. तर काही सेवा स्वस्त तर काही महाग होणार आहेत. 5, 12, 18 आणि 28 टक्के असे वेगवेगळे स्लॅब असणार आहे.


कोणत्या सेवांवर किती जीएसटी टॅक्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

0% जीएसटी दर सेवा : नॉन एसी ट्रेन तिकीट, मेट्रो, बस, ऑटो, शिक्षण, आरोग्य, धार्मिक आणि चॅरिटेबल सेवा, टोल, वीज, निवासी घर भाडे, पीएफआरडीए, ईपीएफओ आणि ईएसआयसीच्या सेवा, संग्रहालय, राष्ट्रीय उद्यानमध्ये एन्ट्री, जनधन आणि अटल पेंशन सारखी सरकारी योजना, रु. 1,000 पर्यंत भाड्याने हॉटेल, दूध, मीट, पीठ, दाळ, तांदूळ


5% जीएसटी दर सेवा : ट्रेन किंवा ट्रकमधून मालवाहतूक, एसी ट्रेनची तिकिटे, कॅब सेवा, विमान इक्वेटोरीयम क्लासची तिकिटे, टूर ऑपरेटर सेवा, विमानाची लीजिंग, प्रिंट मीडियामध्ये एडव्हर्टाइझिंग


12% जीएसटी दर सेवा : रेल्वे कन्टेनरकडून सामान वाहतूक, विमानाचे बिझिनेस क्लास तिकीट, नॉन-एसी रेस्टॉरंटमध्ये भोजन, दररोज 1000-2500 रुपये भाडेकरार हॉटेल, कॉम्प्लेक्स किंवा बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन, पेटंट अधिकारांचे तात्पुरती हस्तांतरण.


18% जीएसटी दर सेवा : फोन बिलं, बँकिंग, विमा आणि इतर वित्तीय सेवा, एसी रेस्टॉरंट्स, आउटडोअर कॅटरिंग आणि अन्न पुरवठा, रोज 2500-5000 रु. भाड्याचे हॉटेल, सर्कस, क्लासिकल नृत्य, थिएटर आणि ड्रम, 250 रुपयेपेक्षा अधिकची तिकीटे, वर्क्स कॉन्ट्रॅक्टची कंपोजिट सप्लाई


28% जीएसटी दर सेवा : चित्रपट तिकीटं, थीम पार्क, वॉटर पार्क, मेरी-गो-फेरी, गोकार्टिंग, कॅसिनो, रेसकोर्स, बॅले, आयपीएल जसे स्पोर्ट्स इव्हेंट, फाइव्ह स्टार किंवा त्याहून अधिक रेटिंग असलेले हॉटेल रेस्टॉरंट, दररोज 5000 रुपये खोली भाडे असलेले हॉटेल, गॅम्बलिंग