नवी दिल्ली : सोने आणि सोन्याच्या दागिण्यांवर ३ टक्के जीएसटी लावण्यात येणार आहे. तसेच हिऱ्यावरही जीएसटी लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज पार पडलेल्या 'जीएसटी' परिषदेच्या बैठकीत दीर्घ चर्चेअंती सोन्यावर ३ टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हिऱ्यांवर देखील ३ टक्केच कर द्यावा लागणार आहे. रफ हिऱ्यांवर मात्र ०.२५ टक्के इतकाच जीएसटी लागू होणार आहे.


येत्या १ जुलैपासून देशात जीएसटी लागू होईल. सोने, चप्पल, बिस्कीट आणि कपडा या वस्तूंवर जीएसटीची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. बिडीवरतीही टॅक्स लावण्यात आला असून, सिगरेटसंबंधी निर्णय ११ जुलैच्या बैठकीत होणार आहे.  


सध्या सोन्यावर २ ते २.५ टक्के कर लावण्यात येत आहे. अशात ३ टक्के कर लागू केल्याने सोन्याच्या किंमतीत काही प्रमाणात वाढ होणार आहे.


 ५०० रुपयांपर्यंतच्या चप्पलवर ५ टक्के तर, त्यापेक्षा जास्ती किंमतीच्या चप्पलवर १८ टक्के जीएसटी लागू होईल. बिस्कीटवर १८ टक्के जीएसटी लागू होईल.


सध्या बिस्कीटवर २०.६ टक्के कर आहे. रेडीमेड कपडयावर १२ टक्के तर धागा आणि तागावर ५ टक्के, मॅनमेड फायबरवर ५ आणि सिंथॅटीक फायबरवर १८ टक्के जीएसटी असणार आहे. शेती संबंधी साहित्यावर ५ टक्के जीएसटी असणार आहे.