Indian Railway Change Gaurd Post Name: भारतातील प्रत्येक राज्यात रेल्वेचं जाळं पसरलेलं आहे. रेल्वेन प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील सर्वाधिक आहे. त्यामुळे ट्रेननं प्रवास करताना नियम जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या माहितीसाठी रेल्वेच्या नव्या नियमानुसार गाड्यांमध्ये यापुढे गार्ड नसतील. तुम्ही वाचलं ते खरं आहे. कारण रेल्वेने गार्डच्या पदनामात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे आता गार्ड्सना 'गुड्स ट्रेन मॅनेजर' म्हटलं जाईल. गेल्या अनेक वर्षांपासून असलेली कर्मचाऱ्यांची मागणी रेल्वेने मान्य केली आहे. आता ट्रेन गार्डला ट्रेन मॅनेजर म्हटले जाईल. रेल्वे बोर्डाकडून सर्व झोनच्या जीएमना लेखी माहितीही देण्यात आली आहे. हा बदल तातडीने लागू करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वेने गार्डच्या पदनामात बदल केला असला तरी जबाबदारी मात्र तशीच राहणार आहे. पदनाम बदलल्याने जबाबदारीत कोणताही फरक पडणार नसल्याची माहिती रेल्वेने दिली. रेल्वेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरही याबाबतची माहिती देण्यात आली आहे. 2004 पासून कर्मचार्‍यांकडून गार्डच्या पदनामात बदल करण्याची मागणी केली जात होती. त्यामागचा त्यांचा तर्क असा होता की, गार्डचे काम फक्त सिग्नलला झेंडा आणि टॉर्च दाखवणे एवढेच नाही.


Relationship: विवाहित महिलांकडे तरुण का आकर्षित होतात? जाणून घ्या मागची 5 कारणं


ट्रेनमधील प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्याबरोबरच पार्सल साहित्याची हाताळणी, प्रवाशांची सुरक्षा आणि ट्रेनच्या देखभालीची जबाबदारीही गार्डवरच असेल. अन्य काही कर्मचाऱ्यांच्या पदांच्या नावांमध्येही बदल करण्यात आले आहेत.


जुना हुद्दा - नवीन पद


  • असिस्टंट गार्ड - असिस्टंट पॅसेंजर ट्रेन मॅनेजर

  • गुड्स गार्ड- गुड्स ट्रेन मॅनेजर

  • सीनियर गुड्स गार्ड - सीनियर गुड्स ट्रेन मॅनेजर

  • वरिष्ठ प्रवासी गार्ड - वरिष्ठ प्रवासी ट्रेन व्यवस्थापक

  • मेल / एक्सप्रेस गार्ड - मेल / एक्सप्रेस ट्रेन व्यवस्थापक