Gudi Padwa 2023: साडेतीन मुहूर्तांपैंकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडव्याचा. आज सोन्याची खरेदी करण्यासाठीही योग्य मुहुर्त आहे. त्याचप्रमाणे आज सोन्याच्या किमतींमध्येही आज घसरण पाहायला मिळते आहे. आज सोन्याचे दर हे कालच्या दरांपेक्षा थोडेसे कमी आहेत परंतु अद्यापही सोन्याचे दर हे 60 हजारांच्या पार आहेत. त्यामुळे आपल्यालाही आज सोन्याच्या खरेदीसाठी मोठी किंमत मोजावी लागेल. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर जर का आज अद्याप तुम्ही सोनं खरेदी करायला गेला नसाल तर यंदा तुम्हाला सोनं खरेदी करण्याची चांगली संधी आहे. आज 24 कॅरेट सोन्याचे दर हे 60,000 रूपये प्रति 10 ग्रॅम एवढे आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर हे 55,000 रूपये प्रति 10 ग्रॅम इतके आहेत. तेव्हा आज या सणाला तुम्ही सोन्याची जोमाने खरेदी करू शकता. 


गुढीपाडव्याला मीन राशीत गुरु चंद्रांच्या युतीमुळे गजकेसरी योग तयार होतं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा सर्वोत्तम योग आहे. साडेतीन मुहूर्त आणि गजकेसरी योग असा हा शुभ मुहूर्त जुळून आला आहे. त्यामुळे सोनं खरेदीसाठी हा गुढीपाडवा अतिशय शुभ आहे. 
  
पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी 21 मार्च 2023 ला रात्री 10.52 वाजता सुरू होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी 22 मार्च 2023 ला रात्री 8.20 वाजता संपणार आहे. उदयतिथीनुसार, गुढीपाडवा 22 मार्च 2023 ला आहे. 
  
गुढी पूजनाचा मुहूर्त सकाळी 6 वाजून 29 मिनिटं ते सकाळी 7 वाजून 39 मिनिटांपर्यंत आहे. गुढीपाडव्याला सोने खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. पाडव्याला सोनं खरेदी शुभ मानलं जातं. गुढीपाडव्याला सोनं खरेदी संपूर्ण दिवस तुम्ही करु शकणार आहात.