Guinness World Records : तुम्ही सर्वांपेक्षा काहीतरी आगळंवेगळं केलंत की ज्याची कोणी कल्पनाही केली नाही. असं काही केलंत तर त्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होते. वर्ल्ड रेकॉर्ड (World Record) काही खायची गोष्ट नाही मात्र अनेक अवलियांनी अगदी सहजपणे असे काही रेकॉर्ड केले आहेत त्याची थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Records) नोंद झाली. अशातच गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने नोव्हेंबरमध्ये झालेले रेकॉर्ड शेअर केले आहेत. यामधील सर्वात थरारक म्हणजे एक व्यक्ती अवघ्या एका मिनिटामध्ये सर्वात जास्त टाळ्या वाजवतो. (guinness world records shares November Month Month latest marathi News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड त्यांच्या ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेले सर्व रेकॉर्ड्स आहेत.  व्हिडिओमध्ये अनेक विश्वविक्रमांची झलक पाहायला मिळत आहे. यामध्ये भारतातील काहींनी जगावेगळ्या अद्भूत गोष्टी करून दाखवल्या आहेत. आंध्र प्रदेशच्या नेल्लोर येथील प्रभाकर रेड्डी यांनी एका मिनिटात 303 अक्रोड फोडले आहेत. तर तामिळनाडूमधील कांचीपुरम येथील एलावसरन एस यांनी उलट्या हाताने टाईप करून दाखवलं आहे. त्यांनी अवघ्या 6.1 सकेंदात हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.



कर्नाटकमधील ब्रँडन जॉन यांनी सायकलवरून 0.07 सेकंदात कोडे सोडवलं. या व्हिडीओमध्ये केरळमधील केव्ही सैदलवाई यांनी  कराटे स्टाईलने एका मिनिटामध्ये पेन्सिल मोडल्या आहेत. जागतिक विक्रमांची नोंद करणाऱ्या या जागतिक संस्थेने त्यांना 'सिंपली इनक्रेडिबल' असे नाव दिले आहे. 


दरम्यान, नोव्हेंबरमध्ये केलेले रेकॉर्ड अविश्वसनीय होते. बुधवारी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केल्यापासून 24,000 हून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तुम्हीही हा व्हिडीओ पाहून चकीत व्हाल.