अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आली असतानाच आक्रमक झालेल्या कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.


पक्ष प्रवक्त्यांनी दिला राजीनामा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरात प्रदेश कॉंग्रेसच्या प्रवक्त्या रेखाबेन चौधरी यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. चौधरी यांनी केवळ प्रवक्तेपदच नव्हे तर, पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता त्या कॉंग्रेसच्या प्राथमिक सदस्याही नाहीत. दरम्यान, चौधरी यांच्या राजीनाम्याचे मुख्य कारण समजू शकले नाही. मात्र, गुजरात विधानसभा निवडणुकीत पक्षाने केलेल्या तिकीट वाटपावर त्या खूश नसल्याची प्राथमिक माहिती आहे.


कॉंग्रेस उमेदवारांची तिसरी यादी जाहीर..


गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. या यादीत एकूण 76 उमेदवारांचा समावेश आहे. पक्षाची अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर होताच सुरतसह काही ठिकाणी पक्ष कार्यकर्त्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये वादविवाद झाले. तर, काही ठिकाणी हाणामारिच्या घटनाही घडल्या.


केवळ कॉंग्रेसच नव्हे, भाजपलाही फटका


दरम्यान, पक्षातील नेत्यांच्या राजीनाम्याचा फटका केवळ कॉंग्रेसच नव्हे तर, सत्ताधारी भाजपलाही बसतो आहे. गेल्याच आठवड्यात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार कानजीभाई पटेल यांनी आपले पूत्र सुनील पटेल यांच्यासह पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला होता.


गुजरातमध्ये दोन टप्प्यात होणार निवडणूक


गुजरातमध्ये दोन टप्प्यांत निवडणूक पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 9 डिसेंबरला (89 विधानसभा जागा) तर, 14 डिसेंबरला (93 विधानसभा जागा ) दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडणार आहे. गुजरातसोबतच हिमाचल प्रदेशमध्येही निवडणुका होत आहेत. त्यामुळे दोन्ही राज्यांतील निवडणुकीची मतमोजनी 18 डिसेंबरला होणार आहे. गुजरात निवडणुकीसाठी 50,128 पोलिंग बूथ बनविण्यात आले आहेत. गोवा नंतर हिमाचल प्रदेश आणि गुजरात ही दोन राज्ये अशी आहेत. ज्यात व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जात आहे.