नवी दिल्ली : गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सोमवारी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत मात्र, त्यापूर्वी विविध चॅनल आणि एजन्सीकडून एक्झिट पोल्स समोर आले आहेत.


(एक्झिट पोल्सची आकडेवारी पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१८२ जागांच्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी एकूण दोन टप्प्यांत मतदान झालं होतं. मतदानाचा दुसरा टप्पा गुरुवारी पूर्ण झाला. तर, हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी ११ नोव्हेंबर रोजी मतदान झालं होतं. त्यानंतर एक्झिट पोल्सचे आकडे समोर आले आहेत.


टाईम्स नाऊ आणि व्हिएमआरने केलेल्या सर्व्हेत भाजपला बहुमत मिळत असल्याचं दिसत आहे.


गेल्या निवडणुकींच्या तुलनेत भाजपच्या जागा कमी झाल्याचा अंदाज या सर्व्हेत समोर आला आहे. कारण, १८२ मतदारसंघांच्या गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये २०१२ मध्ये भाजपला ११५ जागा मिळाल्या होत्या. 
तर, काँग्रेसच्या जागा वाढल्याचं दिसत आहे. कारण, गेल्या निवडणुकीत काँग्रेसला ६१ जागा मिळाल्या होत्या. 


टाईम्स नाऊ आणि व्हिएमआरने केलेल्या सर्व्हेत भाजपने शंभरी क्रॉस करत १०९ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. तर, काँग्रेसला ७० जागांवर समाधान मानावं लागणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


भाजप काँग्रेस इतर  एकूण जागा
१०९ ७० १८२