नवी दिल्ली : गुजरात विधानसभेच्या १८२ जागांसाठी दोन टप्प्यांत डिसेंबरमध्ये मतदान होणार आहे. तर १८ मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीतील संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे होम पिच आहे. त्यामुळे भाजप कशी कामगिरी करतो यावर लक्ष केंद्रीत झालेय. या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय।


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या निवडणुकीत प्रथमच मतदारांना मतदान केल्याची पावती मिळणार आहे. तसेच मतदानानंतर मतदाराला फ्लॅश लाईट दाखवणार येणार आहे. उमेदवाराची सर्व माहिती दाखवण्यात येणार आहे. गुप्तता राखण्यासाठी मतदानाच्या जागेची उंचीही वाढविण्यात येणार असल्याचे, मुख्य निवडणूक आयुक्त अचलकुमार ज्योती यांनी सांगितले.


 गुजरातमधील १८२ जागांसाठी एकूण ४ कोटी ३३ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी ५० हजार १२८ मतदान केंद्र असणार आहेत. सर्व मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येणार आहे.


असा असणार निवडणूक कार्यक्रम


-  २१ नोव्हेंबर रोजी अर्ज दाखल करता येईल
- २१ नोव्हेंबर रोजी अर्जांची छाननी  
- २४ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेता येईल
-  संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे  
- उमेदवारला २८ लाख रुपये खर्चाची मर्यादा
- निवडणूक खर्चासाठी उमेदवाराला स्वतंत्र बँक खाते उघडावे लागेल
- १०२ मतदान केंद्रांवर महिला नियुक्त केल्या जाणार
- मोबाइल अॅपच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे तक्रार करा
- तसेच तक्रारीबाबत फोटोही पाठवता येईल
- पेड न्यूजच्या प्रकारावर यंत्रणेचे लक्ष असणार