नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. तर, काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेत्रृत्वात काँग्रेसला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस पक्षाला केवळ गुजरात नाही तर हिमाचल प्रदेशातही पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेसचा पराभव आणि भाजपचा विजय यानंतर सोशल मीडियातही जोक्सचा महापूर आल्याचं पहायला मिळालं. 


काहींनी राहुल गांधींची खिल्ली उडवली आहे तर कुणी काँग्रेस पक्षाची खिल्ली उडवली आहे. इतकचं नाही तर अनेकांनी ईव्हीएम मशीन हॅकींगच्या मुद्द्यावरही कमेंट्स केल्या आहेत. 


पाहूयात सोशल मीडियातील एक असलेल्या ट्विटरवर कुणी काय कमेंट्स केले आहेत.









गुजरात विधानसभा निवडणुकीच्या १८२ जागांपैकी ९० हून अधिक जागा मिळवत भाजपने विजय मिळवला आहे. तर, हिमाचल प्रदेशातही भाजपनेच विजय मिळवत बहूमताचा आकडा पार केला आहे.


गुजरातमधील १८२ जागांवर एकूण १८२८ उम्मेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. तर, जवळपास ४.३५ कोटी मतदार होते. २०१२मध्ये निवडणूक लढलेल्या १२१ आमदारांनी यंदाच्या निवडणुकीत पुन्हा आपलं नशीब आजमावलं.


गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यांत मतदान झालं. या मतदानात ६७.७५% मतदान झालं. ही आकडेवारी गेल्या निवडणुकीपेक्षा ३.५५% कमी आहे. २०१२च्या विधानसभा निवडणुकीत ७१.३०% मतदान झालं होतं.