नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीची तारीख आज दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान, घोषीत होऊ शकते, अशी सूत्रांची माहिती असून आजपासून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास कामांच्या कामांचा धडाका लावला होता. तसेच अहमदाबाद - मुंबई बुलेट ट्रेन कामाचे भूमिपुजनही केलेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरात विधानसभा निवडणुकीवरुन विरोधकांनी भाजपसह पंतप्रधान मोदींना टार्गेट केले होते. विकासकामांची उद्धघाटने तसेच कामाच शुभारंभ करण्यासाठी निवडणूक आयोग तारखा जाहीर करीत नाही. मोदींच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोग काम करीत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आलाय. त्यामुळे आज निवडणुकीची घोषणा होणार का, याची उत्सुकता आहे.


गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करताना विलंब झाल्याने निवडणूक आयोग दोन टप्प्यांत निवडणूक कार्यक्रम घोषित करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी एक वाजता निवडणूक तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. गुजरात विधानसभेची मुदत पुढील वर्षी २३ जानेवारी रोजी संपत आहे.


१८२ सदस्यांच्या गुजरात विधानसभेच्या हिमाचल प्रदेशसह निवडणुकीची तारीख जाहीर न केल्याबद्दल निवडणूक आयोगावर टीका करण्यात येत आहे. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सीआरपीएफ आणि बीएसएफ आणि केंद्रीय पोलीस दलातील ५५,००० जवान तैनात करण्यात येणार आहेत.