Gujarat Election 2022 : गुजरातमध्ये 1 डिसेंबरला पहिल्या टप्प्यातील मतदान
भाजपची (BJP) गेल्या 27 वर्षांपासून गुजरातमध्ये सत्ता आहे. मात्र यंदा गुजरातमध्ये (Gujrat) भाजपचा सुपडा साफ होईल. गुजरातच्या जनतेला बदल हवाय. विजय आमचाच होईल, असा दावा आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना केलाय.
गांधीनगर : प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर गुजरातमध्ये (Gujarat Assembly Elections 2022) 1 डिसेंबरला मतदान होणार आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा मतदारसंघ आहेत. या एकूण 182 मतदारसंघांसाठी 2 टप्प्यात मतदान पार पडणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात एकूण 19 जिल्ह्यांमधील 89 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानात एकूण 788 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत कैद होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 5 डिसेंबरला पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित एकूण 93 जागांसाठी 833 उमेदवार हे मैदानात असणार आहेत. या निवडणुकीसाठी भाजप, आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने प्रचार केलाय. (gujarat assembly elections 2022 voting will be held to 1 december 1st phase for 89 seats inc bjp aap)
कुणामध्ये कडवी झुंज?
गुजरातची जनता कुणाला सत्तेची सूत्र हाती देतं, हे पाहणं फार चुरशीचं ठरणार आहे. कारण यंदा पहिल्यांदाच गुजरातमध्ये तिरंगी लढत होणार आहे. भाजप, आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने आम्हीच विजयी होऊ असा दावा मतदारांसमोर केला आहे. भाजपची गेल्या 27 वर्षांपासून गुजरातमध्ये सत्ता आहे. मात्र यंदा गुजरातमध्ये भाजपचा सुपडा साफ होईल. गुजरातच्या जनतेला बदल हवाय. विजय आमचाच होईल, असा दावा आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना केलाय.
राज्यात एकूण 182 जागा आहेत. यापैकी 13 जागा अनुसूचित जाती, 27 जागा अनुसूचिक जमाकी या प्रवर्गासाठी राखीव आहे. या एकूण 182 जागांसाठी तब्बल 1 हजार 621 उमेदवार आपलं भाग्य आजमवणार आहेत.
विशेष आणि उल्लेखनीय बाब म्हणजे गुजरातमध्ये 50 टक्के महिला उमेदवार आहेत. मात्र त्या तुलनेत महिलांना उमेदवारी मिळण्याचं प्रमाण फार नगण्य आहे. महिला उमेदवारांची संख्या ही केवळ 189 इतकी आहे. या निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेससह इतर सर्व पक्षांनी 2017 च्या तुलनेत महिला उमेदवारांना प्रथम प्राधान्य देत उमेदवारी दिलीय. त्यामुळे आता पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी गुजरातकर किती टक्के मतदान करतात, याकडे देशाच्या राजकारणाचं लक्ष असणार आहे.