1993 Mumbai Bomblast : मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी गुजरात एटीएसने चार जणांना अटक केली आहे. पोलिसांनी चार आरोपींची छायाचित्रंही प्रसिद्ध केली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अटक करण्यात आलेल्यांची अबू बकर, युसूफ भटका, शोएब बाबा आणि सय्यद कुरेशी अशी नावं आहेत. अटक करण्यात आलेले चारही दहशतवादी कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या जवळचे असल्याचं सांगण्यात येत आहे, ते दाऊदच्या इशाऱ्यावर देशातील विविध शहरांमध्ये गुन्हेगारी घटना घडवत होते.


मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील गुन्हेगार आणि कुख्यात माफिया डॉन दाऊद इब्राहिम हा वॉन्टेड असून त्याच्यावर केंद्र सरकारने वेळोवेळी अनेक प्रकारच्या कायदेशीर नोटिसा बजावल्या आहेत.  अटक करण्यात आलेल्या आरोपींचे दहशतवादी संघटनांशी संबंध असण्याचीही शक्यता असून, दहशतवाद विरोधी पथक त्याची बारकाईने चौकशी करत आहे.


1993 बॉम्बस्फोटाचा अबू बकर हा मुख्य सूत्रधार असल्याचं बोललं जात असून तो यूएई आणि पाकिस्तानात रहात असल्याची माहिती आहे. तीन महिन्यांपूर्वी त्याला यूएईतून अटक करण्यात आली. अबू बकरचं पूर्ण नाव अब्दुल गफूर शेख असं असून तो दाऊचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. 1997 मध्ये अबू बकरविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती.



1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट
1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 257 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 713 गंभीर जखमी झाले होते. या स्फोटात जवळपास 27 कोटी रुपयांची वित्तहानी झाली होती. या स्फोटांच्या किंकाळ्या देशभर ऐकू आल्या होत्या. मुंबईतील बॉम्बस्फोट सुनियोजित पद्धतीने करण्यात आले होते.