मुंबई : गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये गोंधळ बराच वाढला आहे. ज्यामुळे बुधवारी होणार असलेल्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधीही पुढे ढकलण्यात आला. लावण्यात आलेले बॅनर फाडण्यात आल्याचेही कळले. गुजरातचे नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा शपथविधी आधीच पक्षातील अंतर्गत वाद पुढे आला आहे. त्यांच्या मंत्रिमंडळाचा बुधवारी शपथविधी होणार होता, पण आता हा शपथविधी गुरुवारी होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांचे म्हणणे आहे की, गुरुवारी 27 आमदार मंत्री म्हणून शपथ घेतील आणि सर्व नवीन चेहरे असतील. हा शपथविधी सोहळा गुरुवारी दुपारी 1.30 वाजता होणार आहे. याआधीही मंत्रिमंडळात मोठ्या प्रमाणात फेरबदल झाल्याची चर्चा होती, ज्यावर अंतर्गत वाद निर्माण झाला होता.


असे म्हटले जात आहे की नवीन मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल सुमारे 90 टक्के मंत्री बदलू इच्छित होते. अशा परिस्थितीत, फक्त 2-3 जुने चेहरे दिसणार आहेत. ज्यांना पुन्हा मंत्री केले जाईल. मंत्रिपदावरून बाहेर फेकल्या जाण्याच्या भीतीने भाजपचे काही आमदार माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या घरीही भेटले होते.


मिळालेल्या माहितीनुसार, भूपेंद्र पटेल सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात बुधवारी 21 ते 22 मंत्र्यांना मंत्री म्हणून शपथ देण्यात येणार होती. मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना प्राधान्य दिले जाईल आणि महिलांची संख्याही वाढवता येईल. अशा स्थितीत अनेक जुने आणि दिग्गज नेतेही मंत्रिमंडळातून काढून टाकले जातील. जातीचे समीकरण ठरवण्याबरोबरच मंत्रिमंडळात स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांवर विशेष लक्ष देण्याची रणनीती आहे.