अहमदाबाद : गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मुख्यमंत्री विजय रुपाणी मागे पडताना दिसत आहे. सध्याच्या परिस्थितीत माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचं नाव सर्वात पुढे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


२५ डिसेंबरला नवे मुख्यमंत्री


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या २५ डिसेंबरला म्हणजेच माजी पंतप्रधान आणि भाजपचे वरिष्ठ नेते अटल बिहारी वाजपेय़ी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून नवे मुख्यमंत्री शपथ घेतील अशी चर्चा आहे.


दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा विजय मिळवला. गेल्या वेळच्या तुलनेत जागा कमी मिळाल्या असल्या तरी, भाजप बहुमतात आला. त्यामुळे सर्वांनाच उत्सुकता आहे ती, गुजरातमध्ये भाजपचा पुढचा मुख्यमंत्री कोण याची. 


 केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे नाव मागे


भाजपच्या गोटात यावर विचार विनिमय सुरू असतानाच मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावांची चर्चा सध्या सुरू आहे. यात मजी अभिनेत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे नाव आघाडीवर होते. ते नाव मागे पडले आहे. तसेच इराणी यांनीही आपण शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केलेय.


रूपाणी यांच्याऐवजी नावाचा विचार 


१ ८२ जागांपैकी ९९ भाजप, ८०काँग्रेस आणि इतर ३ अशी गुजरात विधानसभेतील पक्षीय बलाबल आहे. या वेळी गुजरातमध्ये भाजप सहाव्यांदा सरकार स्थापन करत आहे. कार्यकर्ते विजयाचा जल्लोष करत असतानाच पक्षाच्या प्रमुख वर्तुळात मुख्यमंत्रीपदावर कोणता चेहरा बसवायाचा यावर चर्चा सुरू आहे. भाजपने सुरूवातील विजय रूपाणी यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून निवड केली होती. मात्र, प्राप्त माहितीनुसार, रूपाणी यांच्याऐवजी भाजप दुसऱ्या नावाचा विचार करत असल्याचे वृत्त आहे.