अहमदाबाद :  गुजरातमध्ये विजय रुपाणी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. 25 डिसेंबरऐवजी आता 26 डिसेंबरला रुपाणी यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिवालय मैदान इथं होणा-या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. 


शनिवारी रुपाणी यांनी राज्यपाल ओ.पी. कोहली यांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा केलाय. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने 182 पैकी 99 जागा जिंकल्यात. यानंतर रुपाणी यांना विधिमंडळ गटाचा नेता निवडण्यात आलं होतं.