Gujarat Garba : गुजरातमध्ये (Gujarat Crime) नवरात्रोत्सवात गरब्याची (Garba competition) धूम सुरु असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गरब्यात मुलीला पुरस्कार मिळाल्यानंतर तिच्या वडिलांची बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आली आहे. गुजरातमधील पोरबंदर येथे एका गरबा कार्यक्रमात मुलीला मिळालेल्या बक्षीसाच्या वादातून मुलीच्या वडिलांना मारहाण करण्यात आली होती. या सगळ्या प्रकारानंतर पोरबंदरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Gujarat Police) घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातच्या पोरबंदर येथील गरबा स्पर्धेतील बक्षीस वितरणातील गैरप्रकाराविरोधात बोलल्याप्रकरणी मंगळवारी एका व्यक्तीला आयोजकांनी बेदम मारहाण केली. मारहाणीत जखमी झालेल्या पीडिताच्या पत्नीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पीडित व्यक्तीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले होते. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी केसवाला, कुचडिया, त्यांच्या पत्नी प्रतीक बोरानिया आणि रामदे बोखिरिया आणि काही अज्ञात लोकांविरुद्ध खून, अपहरण आणि दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


पोरबंदर शहरात नवरात्रीनिमित्त गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृपाली ओडेदरा या मुलीने गरब्याच्या दोन प्रकारात पारितोषिके पटकावली होती. त्यानंतर काही वेळाने आयोजकांसह सुमारे सहा जणांनी मुलीच्या वडिलांना बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर जखमी झालेल्या मुलीच्या वडिलांचा मृत्यू झाला.


गरबा स्पर्धेतील पुरस्कारासाठी निवड झाल्यानंतर मुलगी घरी आली आणि त्यानंतर आईसोबत कार्यक्रमस्थळी पोहोचली. मात्र तिने आईला मुलीने फक्त एकच पुरस्कार जिंकला आहे असे सांगण्यात आलं.. मुलीच्या आईने गरबा आयोजक राजू केसवाला यांना विरोध केला आणि दोनऐवजी एक पुरस्कार का दिला अशी विचारणा करायची होती. त्यावेळी केसवाला यांनी मुलीच्या आईला धमकावले आणि कार्यक्रम संपला असल्याने काहीही करता येणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर मुलीची आई आणि राजू केसवाला यांच्यात जोरदार वाद झाला. यानंतर राजू केसवाला आणि सहआयोजक राजा कुचडिया यांची पत्नी मुलीच्या आईकडे गेल्या आणि दोघांनीही तिला तात्काळ कार्यक्रमस्थळ सोडण्यास सांगितले. तसे न केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली.


त्यानंतर मुलीची आई रात्री एक वाजण्याच्या सुमारास घरी परतली. तिने पतीला सर्व काही सांगितले आणि ती थोडा वेळ पतीसोबत घराबाहेर बसली. सुमारे दीड तासानंतर चार दुचाकीवरून आलेल्या काही जणांनी तिथे पोहोचून मुलीच्या वडिलांना काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. महिलेच्या म्हणण्यानुसार, घराबाहेर मारहाण केल्यानंतर आरोपींनी माझ्या पतीला बळजबरीने दुचाकीवर बसवून कार्यक्रमस्थळी नेले आणि त्यानंतर तेथेही त्यांना बेदम मारहाण केली.