Crime News :  गुजरात हायकोर्टाने (Gujarat High Court) एका प्रकरणात दिलेल्या निर्णयाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. गुजरात हायकोर्टाकडून मॉडेलवर बलात्कार (physical abuse) केल्याचा आरोप असलेल्या 55 ​​वर्षीय फ्रीलान्स फोटोग्राफरला जामीन (Bail) मंजूर करण्यात आला आहे. हायकोर्टाने आरोप करण्यात आलेल्या व्यक्तीची चाचणी केल्यानंतर त्याला जामीन देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी घडलेल्या या प्रकारानंतर आरोप असलेल्या व्यक्तीला अखेर दिलासा मिळाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

23 डिसेंबर 2022 रोजी एका 27 वर्षीय मॉडेलने गुजरात युनिव्हर्सिटी पोलीस ठाण्यामध्ये (Gujarat Police) तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी प्रशांत धानक याला अटक करण्यात आली होती. महिला मॉडेलने आरोप केला होता की, प्रशांत धानकने मॉडेलिंग असाइनमेंटच्या आमिषाने माझ्यावर बलात्कार केला. विजय स्क्वेअरजवळील एका हॉटेलमध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हा सर्व प्रकार घडल्याचे मॉडेलने आपल्या तक्रारीत म्हटले होते. तक्रारीनंतर आरोपी धनक याच्यावर बलात्कारासोबतच धमकी दिल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र कोर्टाने आता धानक यांना जामीन मंजूर केला आहे.


टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आरोपी फोटोग्राफर धानक याला अहमदाबाद सत्र न्यायालयाने 2 मार्च रोजी जामीन नाकारला होता. प्रथमदर्शनी खटला दाखल करण्यात आल्यामुळे धनक यांना सत्र न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला होता. यानंतर प्रशांत धनक यांनी नियमित जामीनासाठी गुजरात हायकोर्टात धाव घेतली होती.  यानंतर सुनावणीदरम्यान धानक यांचे वकील एफ.एन. सोनीवाला यांनी आपल्या याचिकेत हायकोर्टाला सांगितले की, नपुंसक (Impotent Man) व्यक्तीविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली आहे.


यानंतर हायकोर्टात वैद्यकीय अहवाल सादर करण्यात आला. बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे आरोपीच्या चाचणीसाठी वीर्याचे नमुने (Potency Test)  घेण्याची वेळ आली तेव्हा धक्कादायक सत्य समोर आले.  पोलीस तपासादरम्यान वैद्यकीय चाचण्यांद्वारे आरोपीचे वीर्य नमुने गोळा करण्याचा तीन वेळा प्रयत्न करण्यात आला. पण वैद्यकीय अहवालातून त्याचे वीर्यस्खलन होत नसल्याचे समोर आले. 


वकिलाने केला भांडाफोड


"ही खोटी तक्रार होती. आरोपी पुरुषत्व चाचणीत तीनदा नापास झाला होता. आरोपीला तिसऱ्यांदा तपासणीसाठी नेण्यात आले तेव्हा 10 मिनिटांसाठी व्हायब्रेटर लावला गेला आणि त्यानंतर डॉपलर अल्ट्रासाऊंडचाही वापर करण्यात आला. पण काहीही परिणाम झाला नाही. तपास अधिकाऱ्यांनी सर्व पुरावे घेतले. पण धानकचे वीर्य नमुने गोळा करता आला नाही. यामुळेच तो अजूनही अविवाहित आहे," असे धानक यांच्या वकिलांनी सांगितले.


मॉडेलने तक्रार का केली?


दरम्यान, तक्रारदार मॉडेल धानककडे पैशाची मागणी करत होती. पण जेव्हा त्याने पैसे दिले नाहीत तेव्हा मॉडलने एफआयआर दाखल केला, असेही धानकच्या वकिलांनी सांगितले. त्यानंतर न्यायमूर्ती समीर दवे यांनी 10 हजारांच्या जातमचुलक्यावर धानक यांना जामीन मंजूर केला आहे.