पंतप्रधान मोदी यांच्या मतदार संघात भाजपचा पराभव, काँग्रेसचा विजय
गुजरात निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची कसोटी होती. मात्र, भाजपने विजय मिळवला असला तरी राहुल गांधी यांनी यश मिळवल्याचे दिसत आहे. मोदी यांच्या मतदार संघात काँग्रेसचा उमेदवार विजयी झालाय.
अहमदाबाद : गुजरात निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची कसोटी होती. मात्र, भाजपने विजय मिळवला असला तरी राहुल गांधी यांनी यश मिळवल्याचे दिसत आहे. मोदी यांच्या मतदार संघात काँग्रेसचा उमेदवार विजयी झालाय.
मोदींना झटका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडनगर मतदार संघा काँग्रेसचा विजय विजय मिळवल्याने भाजपला आणि मोदीना जोरदार धक्का मानला जात आहे. उंझा मतदार संघात काँग्रेसच्या आशा पटेल या विजयी झाल्यात तर भाजप उमेदवार नारायणभाई पटेल हे पराभूत झाले आहेत.
हिमाचलमध्येही दणका
त्यामुळे भाजपला हा पराभव चांगलाच जिव्हारी लागणार आहे. दरम्यान, हिमाचल प्रदेशात भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार प्रेमकुमार धूमल यांनाही पराभवराचा धक्का बसला. धुमल हिमाचलच्या सुजानपूर मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांच्याविरोधात काँग्रेसनं राजींदर राणांना तिकीट दिलं होतं. त्यामुळे हे पराभव भाजपसाठी आत्मपरीक्षण करणारे आहेत.