नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप विजयाच्या उंबरठ्यावर आहे. यानिमित्ताने एआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपला एक मोलाचा सल्ला दिलाय. ओवेसी यांनी भाजप आणि मोदींना जोरदार टोला लगावलाय. 


काय म्हणाले ओवेसी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओवेसी म्हणाले की, ‘जर भाजपला वाटतं की, त्यांनी गुजरात निवडणुकीत खूप चांगलं काम केलंय, तर त्यांना पुन्हा यावर विचार करण्याची गरज आहे. काय त्यांना नेहमी औरंगजेब आणि पाकिस्तानच्या नावावरच मतं मिळत राहणार’. ते पुढे म्हणाले की, गुजरात निवडणुकीचा निकाल हेच दर्शवतो की, इथे मुस्लिमांना आणखी बाजूला केलं जातंय’.


असदुद्दीन ओवेसी पुढे म्हणाले की, ‘इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांना त्यांच्या सर्वोच्च राजकीय करिअर दरम्यानच लोकांना सत्तेपासून दूर केलं होतं. जेव्हा-जेव्हा विरोधी पक्ष कमजोर पडले, तेव्हा तेव्हा देशातील जनतेने स्वत: विरोधी पक्ष बनत नेत्यांना आणि पक्षांना सत्तेतून बाहेर केलं आहे’.


ओवेसींचा सल्ला


एमआयएमचे प्रमुखांनी इतर पक्षांना भाजपसारखे न वागण्याचा सल्ला दिलाय. ते म्हणाले की, ‘मतदारांना आकर्षित करण्यासाठी नरेंद्र मोदींपासून ते राहुल गांधीपर्यंत एका मंदिरातून दुस-या मंदिरात गेले. पण भाजपला तुम्ही भाजप बनून हरवू शकत नाही. तुम्हाला स्वत:त आणि भाजपमध्ये अंतर ठेवावं लागेल’.


त्यांनी राहुल गांधी यांच्या गुजरात निवडणूक प्रचारावार निशाना साधला. ते म्हणाले की, कॉंग्रेसकडे भाजपला मात देण्याची सुवर्ण संधी होती. पण ते यात यशस्वी होऊ शकले नाही. त्यांनी याकडेही लक्ष वेधलं की, जीएसटी जोरदात विरोध होऊनही व्यापा-यांचे मोठे केंद्र असलेल्या सूरतमध्ये भाजप विजयी झाला आहे.


विरोधकांनी एक व्हावं


ओवेसींनी विरोधकांना एकजुट होण्याचा सल्ला दिलाय. ते म्हणाले की, ‘अखिलेश यादव असो, असदुद्दीन ओवेसी असो किंवा ममता बॅनर्जी...कुणीही भाजपला एकटे हरवू शकत नाही. आपणा सर्वांना एकजुट होण्याची गरज आहे’.